Delhi Election 2025 – बोगस मतदान रोखण्यासाठी निवडणूक आयोगावर लक्ष ठेवा; आदित्य ठाकरे यांचं काँग्रेस, ‘आप’ला आवाहन

Delhi Election 2025 – बोगस मतदान रोखण्यासाठी निवडणूक आयोगावर लक्ष ठेवा; आदित्य ठाकरे यांचं काँग्रेस, ‘आप’ला आवाहन

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी (Delhi Assembly Election) उद्या बुधवारी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणूकीत ‘आप’ (Aap), काँग्रेस (Congress) व भाजप (Bjp) असा तिरंगी सामना रंगणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी सहा नंतर मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी ‘आप’ व काँग्रेसला ट्विटरवरून एक आवाहन केले आहे.

””आम आदमी पार्टी व काँग्रेस या दोन्ही पक्षांना मी आवाहन करतो की त्यांनी उद्या होणाऱ्या मतदानाच्या वेळी निवडणूक आयोगावर Entirely Compromised (EC) बारीक लक्ष ठेवा. आपल्या मालकासाठी निवडणूक आयोग मतदार घोटाळे, बोगस मतदार असे प्रकार घडू देत त्यावर लक्ष ठेवा. गरज वाटल्यास सोबत व्हिडीओ कॅमेरा ठेवा. त्यामुळे आपल्या मालकाच्या फायद्यासाठी मतदान संपत आलेले असताना अचानक वाढणाऱ्या मतदानावर लक्ष ठेवता येईल व खऱ्या मतदारांचा आकडा समोर येईल. फक्त मुक्त व प्रामाणिक मतदान हेच मतदांरांचा खरा सन्मान आहे. आणि त्यानंतर खऱ्या मतदारांनी निवडून दिलेला जो काही निकाल असेल तो, असे आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे.

महाराष्ट्रात संध्याकाळी 6 नंतर किती मतदान झालं, निवडणूक आयोगाला हायकोर्टाची नोटीस

विधानसभा निवडणुकीत महायुतीला विजय मिळवून देणाऱ्या मतांच्या घोळाची सोमवारी उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली. राज्यभरात मतदानाच्या शेवटच्या क्षणी झालेल्या 75 लाख मतांचे गौडबंगाल काय? मतदान अचानक वाढले कसे? सायंकाळी सहा वाजल्यानंतर नेमके किती मतदान झाले? याचा खुलासा करा, असे निर्देश देत न्यायालयाने थेट केंद्रीय निवडणूक आयोगाला नोटीस धाडली आणि दोन आठवडय़ांत उत्तर देण्याचे आदेश दिले. तसेच राज्य निवडणूक आयोगासह राज्य व केंद्र सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले.

75 लाख मतांचा हिशेब नाही

मतदानाची वेळ संपताना व त्यानंतर तब्बल 75 लाख मतदान झाले. या मतदानाचा हिशेब देणारी कोणतीच अधिकृत माहिती सादर झालेली नाही. पारदर्शक मतदानासाठी पुन्हा मतपत्रिकेवर निवडणूक घ्यावी, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

95 मतदारसंघांतील मते जुळत नाहीत

एकूण 95 मतदारसंघांत झालेले मतदान व ईव्हीएमद्वारे झालेली मतमोजणी यात तफावत आली आहे. 19 मतदारसंघांत प्रत्यक्षात झालेल्या मतदानापेक्षा मतमोजणीची आकडेवारी अधिक आहे. 76 मतदारसंघांत झालेल्या मतदानाच्या तुलनेत मतमोजणीचा आकडा कमी आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

 ‘तो’ भूखंड काढून घेण्याच्या मुख्यमंत्र्यांकडून हालचाली  ‘तो’ भूखंड काढून घेण्याच्या मुख्यमंत्र्यांकडून हालचाली
मंगळवार पेठेतील ससून हॉस्पिटल समोरील रस्ते विकास महामंडळाचा सुमारे 400 कोटी रुपयांचा भूखंड 60 कोटी रुपयांमध्ये बिल्डरच्या घशात घातल्याप्रकरणी आता...
ओवी, अभंग, आर्या आणि तरुणाईचे रॅप; महादजी शिंदे एक्सप्रेसमध्ये मराठी साहित्ययात्री संमेलन
महायुतीचा पायगुण… सरकारी नोकऱ्या 16 टक्क्यांनी घटल्या, बेरोजगारी हटविण्याची घोषणा हवेतच
विधानसभेसारखी चूक नको, आता महापालिकेसाठी सज्ज व्हा! उद्धव ठाकरे यांचे आदेश
धावत्या लोकलमध्ये तरुणाचा तीन प्रवाशांवर चाकूहल्ला, कल्याणहून सुटलेल्या दादर फास्टमध्ये रक्तरंजित थराssर
दिल्लीत आजपासून गर्जते मराठी, मराठी हिताचे व्यापक निर्णय होणार का? छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी सज्ज
शिंदेंना एकाच दिवशी फडणवीसांचे दोन धक्के, 1400 कोटींचे मुंबई सफाईचे कंत्राट रद्द, जालन्यातील 900 कोटींच्या सिडको प्रकल्पाची चौकशी