अमेरिकेत पुन्हा विमान दुर्घटना, उड्डाणानंतर 30 सेकंदातच कोसळले, अनेक घरांना आग; सहा जणांचा मृत्यू
अमेरिकेत पुन्हा विमान दुर्घटना घडली आहे. फिलाल्डेफिया येथील विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर 30 सेकंदातच एक विमान दुर्घटनाग्रस्त झाले. शॉपिंग मॉलजवळ हे विमान कोसळले आणि आग लागली. या आगीत अनेक घरे जळाली. या आगीत होरपळून सहा जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. फिलाडेल्फिया आपत्कालीन व्यवस्थापन कार्यालयाने सोशल मीडियावर अपघाताची पुष्टी केली.
JUST IN: New video of the plane crash in Philadelphia. At least 6 people killed pic.twitter.com/zrX3jZcjoO
— BNO News (@BNONews) February 1, 2025
विमानाने ईशान्य फिलाडेल्फिया विमानतळावरून उड्डाण केले. उड्डाणानंतर अवघ्या 30 सेकंदात ते कोसळले. अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नाही. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अपघाताच्या कारणाची सखोल चौकशी करण्यात येईल, असे पेनसिल्व्हेनियाचे गव्हर्नर जोश शापिरो यांनी सांगितले.
This guy was in a drive-thru trying to order food when the plane crashed behind him in Philadelphia pic.twitter.com/4xpOJixzh4
— Mirthful Moments (@moment_mirthful) February 1, 2025
या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले. जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. घटनेची माहिती मिळताच फिलाडेल्फिया अग्निशमन विभाग आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरु केले. आग पसरू नये म्हणून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List