47 महिन्यांनंतर बवंडर बाबा पोचले प्रयागराजला
प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात आतापर्यंत 10 कोटींहून अधिक भाविकांनी स्नान केले. देशविदेशातील साधुसंत कुंभमेळ्यात पोचत आहेत. मध्य प्रदेशच्या इंदूर येथून ‘बवंडर बाबा’ देखील प्रयागराजला पोचले आहेत. सनातन धर्माच्या रक्षणासाठी बवंडर बाबा बाईकवरून यात्रा करत आहेत. याविषयी बवंडर बाबा म्हणाले, मागील 47 महिन्यांपासून हिंदुस्थानची यात्रा सुरू केलेय. हिंदू देवदेवतांच्या प्रतिमा, फोटो, तसबीर यांचा अनादर होऊ नये या उद्देशाने त्यांनी जनजागृतीपर यात्रा सुरू केलेय. लोकांमध्ये जागृती करणे हा उद्देश असल्याचे बाबाने सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List