Mahakumbh 2025 Stampede : सरकारने 18 तास सत्य लपवलं, 6 ठिकाणी झाली होती चेंगराचेंगरी, योगींनी राजीनामा द्यावा; शंकराचार्यांची यांची मागणी
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर अनेक संत-महंतांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेनंतर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनीही उत्तर प्रदेश सरकारवर आपली नाराजी व्यक्त केली आहे.
शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. चेंगराचेंगरीसारखी हृदयद्रावक घटना लपवणे योग्य नाही, अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, असे ते म्हणाले.
‘TV9 भारतवर्ष’शी संवाद साधताना शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले आहेत की, ”मुख्यमंत्र्यांनी (योगी आदित्यनाथ ) एवढी मोठी घटना एक-दोन नव्हे तर 18 तास लपवून ठेवली, हे खूप वेदनादायक आहे. यानंतरही लोकांच्या मृत्यूची आकडेवारी लपवली जात आहे. अफवांवर लक्ष देऊ नका, असे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून सांगितले होते. जोपर्यंत मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले नाही, तोपर्यंत या सर्व गोष्टी फक्त अफवा असल्याचे वाटत होते. मात्र 18 तासांनंतर मुख्यमंत्र्यांनीच अपघात आणि लोकांच्या मृत्यूची कबुली दिली.” शंकराचार्य म्हणाले की, पोलीस अधिकाऱ्याने त्यांना सांगितले होते की, 1-2 नव्हे तर 6 ठिकाणी चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List