फेब्रुवारीत लग्नासाठी 10 दिवसांचा ’शुभ मुहूर्त’
2025 या नव्या वर्षात लग्न करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. फेब्रुवारी महिन्यात विवाह मंगल कार्यासाठी एकूण 10 दिवसांचा ‘शुभ मुहूर्त’ आहे. 4 फेब्रुवारी ते 25 फेब्रवारी यादरम्यान शुभ मुहूर्त आहेत. यामध्ये 4 फेब्रुवारी मंगळवारी सकाळी सव्वा सात ते दुपारी साडेबारापर्यंत, 7 फेब्रुवारी शुक्रवारी सकाळी 9.10 वाजेपासून दुपारी पावणे तीन वाजेपर्यंत, 13 फेब्रुवारी गुरुवारी सकाळी 8 वाजून 5 मिनिटापासून ते दुपारी 1.20 मिनिटांपर्यंत, 14 फेब्रुवारी शुक्रवारी सकाळी साडेदहा ते पावणेचार वाजेपर्यंत, 15 फेब्रुवारी शनिवारी सकाळी 7.50 ते दुपारी 11.45 वाजेपर्यंत, 18 फेब्रुवारी मंगळवारी सकाळी 9 ते दुपारी 1.55 वाजेपर्यंत, 19 फेब्रुवारी बुधवारी सकाळी पावणेसात ते दुपारी सव्वाबारापर्यंत, 20 फेब्रुवारी गुरुवारी सकाळी साडेआठ ते दुपारी 2.10 वाजेपर्यंत, 21 फेब्रुवारी शुक्रवारी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत, 25 फेब्रुवारी मंगळवारी सकाळी 7.10 ते दुपारी दीड वाजेपर्यंत शुभ मुहूर्त आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List