Elphinstone Bridge : ऐन परीक्षेच्या काळात एल्फिन्स्टन पूल पाडल्यास विद्यार्थ्यांची होणार गैरसोय, आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र

Elphinstone Bridge : ऐन परीक्षेच्या काळात एल्फिन्स्टन पूल पाडल्यास विद्यार्थ्यांची होणार गैरसोय, आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र

परळ आणि प्रभादेवीला जोडणारा 125 वर्ष जुना असलेला ब्रिटिशकालीन एलफिन्स्टन पूल (Elphinstone Bridge) फेब्रुवारीच्या अखेरीस पाडला जाणार आहे. ऐन परीक्षेच्या काळात हा पूल पाडल्यास विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होऊ शकते, याचबाबत चिंता व्यक्त करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहिलं आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात आदित्य ठाकरे म्हणाले आहेत की, ”महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू केलेला वरळी-शिवडी कनेक्टर हा एक महत्वपूर्ण प्रकल्प आहे. परंतु गेल्या दोन वर्षांमध्ये या प्रकल्पाचे काम संथ गतीने चालू आहे. सदर प्रकल्पाचाच एक भाग असलेला एल्फिन्स्टन पूल फेब्रुवारी महिन्यात पाडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, असे समजते. सदर पूल पाडल्यानंतर या भागात वाहतूक कोंडी होऊन विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या काळामध्ये त्यांना त्रास होण्याची शक्यता आहे. तरी विद्यार्थ्यांचा परीक्षेचा काळ लक्षात घेऊन पूल पाडण्याचे काम परीक्षेच्या काळानंतर करण्यात यावे.”

त्यांनी पत्रात पुढे लिहिलं की, ”वरळी शिवडी कनेक्टरचे इतर काम प्रलंबित न ठेवता, वरळी शिवडी कनेक्टर लवकरात लवकर पूर्ण होईल याची काळजी घेतली जावी, ही विनंती.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईतील ‘या’ पाच भागात 2 दिवस पाणीपुरवठा राहणार बंद, तुमच्या विभागात काय असणार स्थिती? मुंबईतील ‘या’ पाच भागात 2 दिवस पाणीपुरवठा राहणार बंद, तुमच्या विभागात काय असणार स्थिती?
फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला मुंबईतील काही भागात पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. मुंबईत 2400 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित करण्यासाठी काही भागाचा...
Mahakumbh 2025 Stampede : सरकारने 18 तास सत्य लपवलं, 6 ठिकाणी झाली होती चेंगराचेंगरी, योगींनी राजीनामा द्यावा; शंकराचार्यांची यांची मागणी
Maghi Ganeshotsav – कणकवलीतील जामसंडेमध्ये माघी गणेश जयंती उत्सव, श्रींचे धुमधडाक्यात आगमन
Ranji Trophy 2025 – पुजारा-बदोनी-रहाणे ठरले Nervous Nineties चे शिकार, दोन फलंदाज 99 वरच बाद
Weightloss Drinks: झटपट वजन कमी करण्यासाठी सकाळी ‘या’ ड्रिंक्स करा ट्राय…
Elphinstone Bridge : ऐन परीक्षेच्या काळात एल्फिन्स्टन पूल पाडल्यास विद्यार्थ्यांची होणार गैरसोय, आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र
Santosh Deshmukh Case : आमच्या कुटुंबाला धमकी वजा इशारा सोशल मीडियावर येतोय, धनंजय देशमुख यांनी पोलीस अधीक्षकांची घेतली भेट