कृषी उद्योगासाठी एआयएमची मार्चमध्ये परिषद
भारतीय कृषी क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन करण्यासाठी खते आणि शेती औषधे निर्मिती क्षेत्रात कार्यरत असणाऱया ऑल इंडिया अॅग्रो इनपुट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने पुढाकार घेतला असून याचाच एक भाग म्हणून पुण्यात अखिल भारतीय ऑल इंडिया मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने बीटूबी परिषद आयोजित केली आहे. ही परिषद येत्या 3 आणि 4 मार्च 2025 रोजी ही होईल, अशी माहिती एआयएम असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमार धुरगुडे पाटील यांनी दिली. यावेळी असोसिएशनचे सचिव समीर पाथरे आणि खजिनदार सर्जेराव शिसोदे उपस्थित होते. एआयएमतर्फे आयोजित केली जाणारी ही दुसरी परिषद आहे. गेल्या वर्षी दिल्लीत परिषद आयोजित करण्यात आली होती. शंभरहून अधिक स्टॉल्स या परिषदेत मांडले जाणार आहेत. त्याशिवाय अत्याधुनिक कृषी निविष्ठा (इनपुट) उपाय, नावीन्यपूर्ण कच्चा माल आणि शाश्वत शेती तंत्रज्ञानाचे प्रदर्शन यात सादर होणार आहे. नोंदणी, प्रायोजकत्व आणि स्टॉल बुकिंगबद्दल अधिक माहितीसाठी, abc.aimassociationindia.com ला भेट द्या किंवा 9689152837 वर संतोष दळवी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन समीर पाठारे यांनी केले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List