ते उत्तम संगीतकार आहेत, पण गायक म्हणून…; सोनू निगम ए. आर रहमानबद्दल असं काही बोलला की चाहतेही झाले अवाक

ते उत्तम संगीतकार आहेत, पण गायक म्हणून…; सोनू निगम ए. आर रहमानबद्दल असं काही बोलला की चाहतेही झाले अवाक

बॉलीवूडचा गायक सोनू निगम त्याच्या रोखठोक विधानांसाठी प्रसिद्ध आहे. नुकतेच त्याने गायकांना पद्मश्री पुरस्कार न मिळाल्याने प्रश्न उपस्थित केले होते. आता तर तो संगीतकार ए. आर रहमान विषयी असे काही बोलला की चाहत्यांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे.

सोनू निगम हा लोकप्रिय गायक आहे. तर ए.आर रहमान हे लोकप्रिय संगीतकाराबरोबरच त्यांनी काही गाणीही गायली आहेत. त्यामध्ये रहना तू, तेरे बिना, ख्वाजा मेरे ख्वाजा सारख्या गाण्यांचा समावेश आहे. ते 1990 पासून काम करत आहेत. त्यामुळे जेव्हा एखाद्यासोबत जास्त काम केल्यानंतर त्या व्यक्तीला आपण जास्त ओळखू लागतो. अशातच सोनू निगम याने एका मुलाखतीत ए. आर रहमान चांगले गायक नसल्याचा खुलासा केला. सोनू निगम याने 02 इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत ए. आर रहमान यांच्याविषयी वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, रहमान यांनी गायकीचे प्रशिक्षण घेतलेले नाही. मात्र, त्यांच्या आवाजातील स्वर चांगला आहे. त्यांच्या म्हणण्यांनुसार ए. आर रहमान स्वत: सोनूच्या या मताशी सहमती दाखवतील आणि ते चांगले गायक नसल्याचे मान्यही करतील.

सोनू निगम याने आपला मुद्दा स्पष्ट करत म्हटले की, ‘अर्थातच ए. आर रहमान प्रशिक्षित गायक नाहीयेत. त्यांचा आवाज चांगला आहे, ते स्वतः कधीही स्वतःला महान गायक म्हणणार नाहीत. मग आपण याबद्दल काय म्हणू शकतो? ते एक उत्तम संगीतकार आहेतच आणि म्हणूनच ते नेहमीच सुरात असतात. संगीताशी संबंधित लोकांसाठी सुरात राहणे ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. जर कोणी सुरात नसेल तर त्याच्या आवाजाला काही अर्थ नाही. सोनू निगम पुढे म्हणाला, ‘त्यांचा आवाज भलेही चांगला नसेल, पण ते नेहमीच सुरात असतात कारण ते ए.आर रहमान आहेत. रहमानच्या गायनाबद्दल बोलताना सोनू निगमने एका घटनेची आठवण केली. ते म्हणाले रहमान यांच्या परवानगीने जोधा अकबर चित्रपटातील ‘इन लम्हो’ या गाण्याचा एक छोटासा भाग लिहिला आहे. जेव्हा सोनूने गाण्याचा तो छोटासा भाग लिहिला तेव्हा रहमानला तो आवडला आणि तो गाण्यात जोडण्यात आला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईतील ‘या’ पाच भागात 2 दिवस पाणीपुरवठा राहणार बंद, तुमच्या विभागात काय असणार स्थिती? मुंबईतील ‘या’ पाच भागात 2 दिवस पाणीपुरवठा राहणार बंद, तुमच्या विभागात काय असणार स्थिती?
फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला मुंबईतील काही भागात पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. मुंबईत 2400 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित करण्यासाठी काही भागाचा...
Mahakumbh 2025 Stampede : सरकारने 18 तास सत्य लपवलं, 6 ठिकाणी झाली होती चेंगराचेंगरी, योगींनी राजीनामा द्यावा; शंकराचार्यांची यांची मागणी
Maghi Ganeshotsav – कणकवलीतील जामसंडेमध्ये माघी गणेश जयंती उत्सव, श्रींचे धुमधडाक्यात आगमन
Ranji Trophy 2025 – पुजारा-बदोनी-रहाणे ठरले Nervous Nineties चे शिकार, दोन फलंदाज 99 वरच बाद
Weightloss Drinks: झटपट वजन कमी करण्यासाठी सकाळी ‘या’ ड्रिंक्स करा ट्राय…
Elphinstone Bridge : ऐन परीक्षेच्या काळात एल्फिन्स्टन पूल पाडल्यास विद्यार्थ्यांची होणार गैरसोय, आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र
Santosh Deshmukh Case : आमच्या कुटुंबाला धमकी वजा इशारा सोशल मीडियावर येतोय, धनंजय देशमुख यांनी पोलीस अधीक्षकांची घेतली भेट