Santosh Deshmukh Case : आमच्या कुटुंबाला धमकी वजा इशारा सोशल मीडियावर येतोय, धनंजय देशमुख यांनी पोलीस अधीक्षकांची घेतली भेट

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना सोशल मीडियावर धमक्या येत आहेत, अशी माहिती धनंजय देशमुख यांनी दिली. याबाबत बोलताना ते म्हणाले आहेत की, ”आमच्या कुटुंबाला धमकी वजा इशारा सोशल मीडियावर येतोय.” धनंजय देशमुख हे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयात पोहोचले आहे. याआधी माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत.
काय म्हणाले धनंजय देशमुख?
माध्यमांशी संवाद साधताना धनंजय देशमुख म्हणाले की, ”आमच्या कुटुंबाला धमकी वजा इशारा सोशल मीडियावर येतोय. याच संदर्भात मला नवनीत कॉवत यांच्याशी चर्चा करायची आहे. तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाची माहितीही जाणून घेण्यासाठी मी त्यांची भेट घेत आहे.”
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News

Comment List