राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा मागावा, त्यांच्यासोबत चहा कसला पिताय – संजय राऊत

राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा मागावा, त्यांच्यासोबत चहा कसला पिताय – संजय राऊत

ईव्हीएम घोटाळ्यासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घ्यावी असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच फडणवीस, शिंदे आणि अजित पवार हे भेटतात आणि एकमेकांना चिमटे काढून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झालो की नाही याची खातरजमा करतात असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, लोकांना फुकट धान्य देणं हे अर्थव्यवस्था चांगलं असण्याचं लक्षण नाही. ज्या पद्धतीने रुपया लुडकत खाली गाडला गेला, 87 रुपये हे काही चांगल्या अर्थव्यवस्थेचे लक्षण नाही. त्यांचे म्हणणं आहे की गोरगरीबांवर लक्ष्मी प्रसन्न व्हावी अशी मी प्रार्थना करतो. आता हे गोरगरीब कोण? गेल्या 10 वर्षात लक्ष्मी प्रसन्न झाली आहे ती भाजपच्या तिजोरीवर, मोदींचे मित्र अदानींवर. या देशात सर्वात गरीब कोणी असतील तर ते गौतम अदानी, आणि लक्ष्मी त्यांच्यावर प्रसन्न व्हावी या साठी देशाच्या आर्थिक योजना, अर्थसंकल्प राबवले जातात. त्यामुळे मोदींच्या बोलण्यावर गरीबांनी विश्वास ठेवू नये असेही संजय राऊत म्हणाले.

सोनिया गांधी या कुठल्या संदर्भात म्हणाल्या हे पाहणं महत्त्वांच आहे. मी त्यांचं वक्तव्य ऐकलेलं नाही. आणि या देशाच्या राष्ट्रपतीपदावर पूर लेडी बसली असेल तर ते कौदुकास्पद आहे असे संजय राऊत म्हणाले. एका सामान्य, गरीब घरातली स्त्री या देशाची राष्ट्रपती झाली. आणि त्यांना जर पूअर म्हटलं असेल तर त्यात मला काही चुकीचं वाटत नाही. सामान्य माणसांना सर्वोच्च पदावर बसवण्याची भूमिका कोणी घेतली असेल, पूअर लेडी किंवा पूअर मॅन म्हणून त्या अर्थानेही पूअर होतं. आणि दुसरं म्हणजे दबावाखाली असलेली सर्वोच्च पदावर बसलेली पुअर मॅन किंवा पुअर लेडी म्हटलं जातं. राष्ट्रपती मुर्मू यांची प्रकृती पुअर झाली असेल. तुम्ही प्रत्येक शब्दाचा किस काढून विरोधी पक्षाच्या संदर्भात ही भूमिका घेणं हे चुकीचं आहे. अशा अनेक शब्दावल्या सत्ताधाऱ्यांना वापरल्या आहेत. मग सोनिया गांधी यांच्या आजारपणावर असेल, उद्धव ठाकरे असतील, राहुल गांधी असतील, शरद पवार असेल, लटकती आत्मा, भटकती आत्मा काय प्रकार आहे? पवार साहेबांना तुम्ही भटकती आत्मा म्हणता, उद्धव ठाकरेंना नकली संतान म्हणालात, तसंच पुअर लेडी. राजकारणात ही भाषावली, हे शब्दरत्न उदयाला भाजपने सुरू केली. पण राष्ट्रपतींचा सन्मान राहिला पाहिजे. राष्ट्रपतींविषयी अपशब्द वापरला जाऊ नये. आणि पुअर लेडी आणि पुअर हा शब्द असंसदीय नाही असेही संजय राऊत म्हणाले.

राज ठाकरे हे भाजपचे मित्र आहेत.राज ठाकरे हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे समर्थक आहेत. आमच्या दृष्टीने अमित शहा, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्रातल्या संदर्भातली भूमिका बरी नाही असे संजय राऊत म्हणाले. आणि अशा लोकांचे राज ठाकरे राजकीय मित्र आहेत आणि एकमेकांना मदत करतात. आता भाजपच्या अंतस्थः गोटातील या मित्राने ईव्हीएमचा घोटाळा, ईव्हीएममधली मतं गायब झाली त्यामुळे सध्याचे सरकार सत्तेवर आलं, हे त्या अदृश्य मतातून आलं जे गायब झालं. म्हणजे हा थोडक्यात हा घोटाळा आहे. आता राज ठाकरे यांच्या मनात जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, हे प्रश्न घेऊन त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलं पाहिजे. आणि फडणवीस काय उत्तर देतात हे महत्त्वाचं असून हा संवाद अतिशय महत्त्वाचा आहे. या दोघांमधला संवाद हा लाईव्ह लोकांना दाखवलं पाहिजे. राज ठाकरे हे फडणवीसांना ईव्हीएमवर प्रश्न विचारतात, तु्म्ही मुख्यमंत्री कसे झालात हे विचारतात. आणि देवेंद्र फडणवीस हे जनतेला उत्तर देत आहेत हा संवाद लोकांना कळाला तर लोकांच्या मनातली जळमटं दूर होतील. राज ठाकरे जेव्हा फडणवीसांना, एकनाथ शिंदेंना भेटतील तेव्हा तुम्ही ही जाहीर चर्चा लोकांपर्यंत पोहोचवा असेही संजय राऊत म्हणाले.

राज ठाकरे यांनी ज्या शंका उपस्थित केल्या आहेत त्या शंका फडणवीस दूर करणार नाहीत. फडणवीस प्रश्न विचारणाऱ्यांना खिशात घालतील. फडणवीसांचा खिसा हा श्रीमंतांचा आहे. त्या खिशात जे जातात ते बाहेर येत नाहीत. पण तरीही कुणाला प्रश्न पडत असतील तर त्यांनी लोकनेते आहोत, लोकप्रतिनीधी आहोत या नात्याने त्यांना वारंवार हे प्रश्न विचारले पाहिजेत. राज ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर जे प्रश्न विचारले हे सगळ्यांच्या मनातले प्रश्न आहेत. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे पक्ष जिंकले कसे? ते अजून धक्क्यातून सावरलेले नाहीत. मला तर कळालंय की तिघेही एकत्र भेटतात आणि एकमेकांना चिमटे काढतात आणि खरोखर आपण जिंकलोय का, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री झालोय का याची खातरजमा करतात. ईव्हीएम घोटाळ्यातून फडणवीसांना मुख्यमंत्रीपद मिळाले असेल असे राज ठाकरे म्हणत आहेत तर त्यांनी राजीनामा मागायला पाहिजे, त्यांच्यासोबत चहा कसला पिताय असेही संजय राऊत म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘लाफ्टर शेफ 2’ चे स्पर्धक गडगंज श्रीमंत, कोणाकडे 80 लाखाचं घड्याळ, तर कोणाकडे 50 कोटींचं घर ‘लाफ्टर शेफ 2’ चे स्पर्धक गडगंज श्रीमंत, कोणाकडे 80 लाखाचं घड्याळ, तर कोणाकडे 50 कोटींचं घर
‘लाफ्टर शेफ 2’ सीझन कलर्स टीव्हीवर सुरु झाला आहे. यावेळी सीझनमध्ये अनेक ओळखीचे चेहरे आहे. रुबीना दिलैक पासून अंकिता लोखंडे...
चित्रपटगृहांच्या बाहेर शेंगदाणे विकायचा ‘हा’ अभिनेता; आज बॉलिवूडचा सुपरस्टार
उदित नारायण यांनी लाईव्ह शोमध्ये महिलेला केलं Lip Kiss! नेटकऱ्यांमध्ये संताप, व्हिडीओ सर्वत्र व्हायरल
Budget 2025 – केंद्रीय अर्थसंकल्प सादर, काय स्वस्त आणि काय महाग झालं? वाचा…
Budget 2025 – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पात बिहारसाठी घोषणांचा पाऊस; विमानतळ, IIT आणि अन्न प्रक्रिया केंद्रांचा समावेश
आठवड्यातून 90 तास कामाचं विसरा, 200 कंपन्या करणार कायम स्वरुपी चार दिवसांचा आठवडा, तीन दिवस सुट्टी!
दाट धुक्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले, गाडी थेट कालव्यात कोसळली; 10 जण बेपत्ता