भररस्त्यात महिलेचा पाठलाग करत हत्या, अल्पवयीन मुलासह तिघांना अटक

भररस्त्यात महिलेचा पाठलाग करत हत्या, अल्पवयीन मुलासह तिघांना अटक

वडिलांसोबत विवाहबाह्य प्रेमसंबंध ठेवल्याच्या रागातून एका अल्पवयीन मुलाने वडिलांच्या प्रेयसीची हत्या केल्याची घटना कोलकातात उघडकीस आली. याप्रकरणी अल्पवयीन मुलासह गुन्ह्यात मदत केल्याप्रकरणी त्याच्या आईसह अन्य एकाला पोलिसांनी अटक केली आहे. पूर्व कोलकात्यातील एका वर्दळीच्या रस्त्यावर गुरुवारी संध्याकाळी ही घटना घडली.

आरोपीचे वडील आणि पीडिता कारमध्ये बसले असताना मुलगा आणि आईने त्यांना रंगेहाथ पडकले. यानंतर मुलाने पीडितेला कारमधून बाहेर ओढले आणि तिच्यार हल्ला केला. यानंतर पीडिता जीव वाचवण्यासाठी पळत होती. तसेच मदतीसाठी याचना करत होती. आरोपीने महिलेचा पाठलाग करून तिच्यावर हल्ला केला.

पीडितेला गंभीर जखमी अवस्थेत सरकारी एनआरएस मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या मानेवर आणि हातावर खोलवर जखमा होत्या. तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी 16 वर्षीय मुलगा, त्याची आई आणि अन्य एका 22 वर्षाच्या साथीदाराला अटक केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘लाफ्टर शेफ 2’ चे स्पर्धक गडगंज श्रीमंत, कोणाकडे 80 लाखाचं घड्याळ, तर कोणाकडे 50 कोटींचं घर ‘लाफ्टर शेफ 2’ चे स्पर्धक गडगंज श्रीमंत, कोणाकडे 80 लाखाचं घड्याळ, तर कोणाकडे 50 कोटींचं घर
‘लाफ्टर शेफ 2’ सीझन कलर्स टीव्हीवर सुरु झाला आहे. यावेळी सीझनमध्ये अनेक ओळखीचे चेहरे आहे. रुबीना दिलैक पासून अंकिता लोखंडे...
चित्रपटगृहांच्या बाहेर शेंगदाणे विकायचा ‘हा’ अभिनेता; आज बॉलिवूडचा सुपरस्टार
उदित नारायण यांनी लाईव्ह शोमध्ये महिलेला केलं Lip Kiss! नेटकऱ्यांमध्ये संताप, व्हिडीओ सर्वत्र व्हायरल
Budget 2025 – केंद्रीय अर्थसंकल्प सादर, काय स्वस्त आणि काय महाग झालं? वाचा…
Budget 2025 – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पात बिहारसाठी घोषणांचा पाऊस; विमानतळ, IIT आणि अन्न प्रक्रिया केंद्रांचा समावेश
आठवड्यातून 90 तास कामाचं विसरा, 200 कंपन्या करणार कायम स्वरुपी चार दिवसांचा आठवडा, तीन दिवस सुट्टी!
दाट धुक्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले, गाडी थेट कालव्यात कोसळली; 10 जण बेपत्ता