जालन्यात रेल्वे रुळावर ट्रक फसला, रेल्वे चालकांच्या प्रसंगावधाने अपघात टळला

जालन्यात रेल्वे रुळावर ट्रक फसला, रेल्वे चालकांच्या प्रसंगावधाने अपघात टळला

रेल्वे रूळावरून पलीकडे जातांना ट्रक रूळावरच फसलेला असताना तिकडून नांदेडकडे जाणारी तपोवन एक्सप्रेसही जवळ जवळ आली होती, परंतू रेल्वेचालकाने प्रसंगावधान राखत वेळीच रेल्वे रोखल्याने मोठा अपघात टळला. तिकडे रेल्वे येत असल्याचे पाहून ट्रकचालक ट्रक रूळावरच सोडून पसार झाला.रेल्वे पोलिस आणि आरपीएफच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी पोहचून सदर ट्रक ट्रेलरच्या सहाय्याने बाजूला करीत वाहतूक सुरळीत केली.

ही घटना परतूर – जालना लोहमार्गावर सारवाडीजवळ आज शुक्रवारी 31 जानेवारी रोजी दुपारी 2.30 ते 3 वाजेच्या सुमारास घडली. तपोवन एक्स्प्रेस जालन्याहून दुपारी 2.30 वाजता निघून नांदेडकडे जात असताना सारवाडीजवळ एका चालकाने ट्रक थेट रेल्वे पटरीवर चढवून रूळाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला, परंतू तो ट्रक रूळावरच फसल्याने तो मागे पुढे होत नव्हता, ट्रक बाहेर काढण्याचे चालकाचे प्रयत्न सुरू असतानाच नांदेडकडे जाणारी तपोवन एक्सप्रेस सायरन वाजवत जवळ आली होती, मोठा अनर्थ होईल या भितीपोटी चालकाने ट्रक तसाच रूळावर सोडून पलायन केले. त्याचवेळी रूळावर ट्रक पाहून रेल्वेचालकाने प्रसंगावधान राखत अलिकडेच गाडी थांबवली.

घटनेची माहिती मिळताच आरपीएफचे पोलिस निरीक्षक पवन इंगळे, पोलिस उपनिरीक्षक विजय वाघ, पोकॉ. संदीप जाधव, जीपीएफचे कर्मचार्‍यांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलीस निरीक्षक इंगळे यांनी समयसूचकता लक्षात घेवून ट्रेलर व अन्य साहित्य मागवून सदर ट्रक महत प्रयत्यानंतर रूळावरून खाली उतरवित गाड्यांचा मार्ग मोकळा केला. या घटनेमुळे सुमारे एक ते दीड तास रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. ट्रक रूळाच्या बाजूला केल्यानंतर तपोवन, नरसापूर व अन्य गाड्या मार्गस्थ झाल्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अमेरिकेत पुन्हा विमान दुर्घटना, उड्डाणानंतर 30 सेकंदातच कोसळले, अनेक घरांना आग; सहा जणांचा मृत्यू अमेरिकेत पुन्हा विमान दुर्घटना, उड्डाणानंतर 30 सेकंदातच कोसळले, अनेक घरांना आग; सहा जणांचा मृत्यू
अमेरिकेत पुन्हा विमान दुर्घटना घडली आहे. फिलाल्डेफिया येथील विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर 30 सेकंदातच एक विमान दुर्घटनाग्रस्त झाले. शॉपिंग मॉलजवळ हे...
मोदीsss मोदीऽऽऽ मोदीsss मोदीsss मोदीsss..विकास हरवला… जीडीपी रोडावला; आर्थिक पाहणी अहवालातील चित्र चिंताजनक
नुकसान भरपाई द्यावी लागेल म्हणून सरकारने मृतांचे आकडे लपवले
जैन मंदिर दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांनाही नुकसानभरपाई द्या! ऑल इंडिया जैन जर्नालिस्ट असोसिएशनची मागणी  
महाकुंभमेळ्यात त्याच रात्री आणखी एक चेंगराचेंगरी, योगी आणि मोदी सरकारची लपवाछपवी; 1500 हून अधिक भाविक बेपत्ता
मराठी माणसाला कलह करायला आवडतो, विश्व मराठी संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात देवाभाऊंनी दिला आठव्या शतकातील दाखला
माशाच्या ‘चन्ना एम्फिबियस’ प्रजातीचा 92 वर्षांनी पुनर्शोध, ठाकरेवाइल्डलाइफ फाऊंडेशनची ‘चमकदार’ कामगिरी