शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिनानिमित्त विविध उपक्रम

शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिनानिमित्त विविध उपक्रम

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त शिवसेना, युवासेना आणि विविध सामाजिक संस्थांतर्फे मुंबईसह राज्यभरात रक्तदान शिबीर, रुग्णांना फळवाटप अशा सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.

रेल कामगार सेनेचे अध्यक्ष, शिवसेना नेते विनायक राऊत, कार्याध्यक्ष संजय जोशी, सरचिटणीस दिवाकर देव यांच्या नेतृत्वाखाली मध्य रेल्वेतील कर्मचाऱ्यांसाठी फुल बॉडी मेडिकल हेल्थ चेकअप कॅम्प छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मध्यवर्ती कार्यालयात आयोजित करण्यात आले होते. यावेळी रेल कामगार सेनेचे तसेच मध्य रेल्वे स्थानीय लोकाधिकार समितीचे उमेश नाईक, नरेंद्र तळेकर, नरेश बुरघाटे, संतोष शेलार, प्रल्हाद सकपाळ, तिरुमलेश अंबाला, मल्हारी भटाटे, अभिजित भोसले, विजय शिरोडकर, शैलेश शिंदे, संजय माने, अतुल राणे, यामिनी भानुशाली, अनिता वैते यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला. युनिकेअर हेल्थ सेंटरचे डॉ. सोमनाथ रसाळ, डॉ. पूजा यादव यांनी संपूर्ण व्यवस्था सांभाळली.

मोबाईलचा वाढता अतिरेक टाळून मुलांमध्ये खेळांमुळे येणारी ऊर्जा आणि स्पर्धात्मक भावना जागृत करण्यासाठी मुंबई समन्वयक अभिषेक पाताडे आणि शिवसेना शाखा क्र. 194 तर्फे ‘छावा बाळासाहेबांचा’ या नव्या उपक्रमाची सुरुवात करण्यात येत आहे. या उपक्रमाचा शुभारंभ शिवसेना नेते – खासदार अनिल देसाई यांच्या हस्ते करण्यात आला.

विभागप्रमुख-आमदार महेश सावंत यांनी माहीम विधानसभेतील दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रश्नसंच उपलब्ध करून दिले. त्याचे वाटप शाखाप्रमुख संजय भगत यांनी पालिकेच्या प्रभादेवी शाळेतील विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक खाडे तसेच किरण पाटील यांच्या उपस्थितीत केले. यावेळी लक्ष्मण भोसले, विभाग संघटक रेखा देवकर, कीर्ती मस्के, रत्नाकर चिरनेरकर, कुणाल आंब्रे, रवी गजने, उल्हास कदम, अर्चना पाटील, शीतल नागवेकर, सुप्रिया चव्हाण, साहिल कदम, तन्मय विलनकर उपस्थित होते.

शिवसेना शाखा क्रमांक 128 च्या वतीने विभागातील जनतेसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन वेदांत सेंट्रल हॉस्पिटलच्या सहकार्याने करण्यात आले होते. यावेळी घाटकोपर पश्चिम विधानसभेचे उपविभागप्रमुख विलास पवार, निरीक्षक नीलेश जंगम, विधानसभा संघटक रवींद्र घाग, विधानसभा सहसंघटक घनश्याम रजपूत, शाखाप्रमुख गजानन काकडे, मंदार सावंत, आप्पा चव्हाण, मोहन बेंद्रे आदी उपस्थित होते.

समर्थ प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने विद्याविहार येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हस्तशिल्प साकारण्यात आले आहे. याची पाहणी करताना प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास लिगाडे, नंदकिशोर परुळेकर, समन्वयक प्रसाद कामतेकर, सचिन भांगे, विशाल चावक, गणेश परब, योगेश मोर्या, चंद्रकांत हळदणकर, दीपक आंबोलकर उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेची मोठी बातमी… आदिती तटकरे म्हणाल्या, त्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका… Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेची मोठी बातमी… आदिती तटकरे म्हणाल्या, त्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका…
‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा’ सातवा, जानेवारी महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास शुक्रवारपासून सुरू झाला आहे. महिला व बालकल्याण...
मालिश केलं, कुशीत झोपवलं, जेवण भरवलं.. कॅन्सरग्रस्त हिना खानची बॉयफ्रेंड घेतोय अशी काळजी
किन्नर अखाड्यात ममता कुलकर्णीचं काय काम? महामंडलेश्वर बनण्यावरून वाद वाढला
‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत रंगणार श्री आणि सौ स्पर्धा; 25 लाखांचं बक्षीस
Photo – प्रजासत्ताक दिनानिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट
शेअर मार्केटचे आमिष दाखवत २३ लाखांना गंडवले; वैजापुरात तिघांविरुद्ध गुन्हा
गुइलेन बॅरे सिंड्रोमचा पहिला बळी, पुण्यात आजाराची लागण झालेल्या सीएचा सोलापुरात मृत्यू