पश्चिम महाराष्ट्रात भारतमाता, संविधानाचे पूजन
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी राष्ट्रीय मतदारदिनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रात सर्वत्र भारतमाता आणि संविधानाचे पूजन करण्यात आले. अनेक ठिकाणी घंटानाद करीत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. संविधानाचे सामुदायिक वाचन करीत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’, ‘संविधानाचा विजय असो…’ अशा घोषणा देण्यात आल्या.
संविधान वाचवण्यासाठी शिवसैनिकांचा घंटानाद
भाजपकडून सुरू असलेल्या अनागोंदी कारभारामुळे देशाची लोकशाही आणि संविधान धोक्यात आले आहे. हा धोका टाळण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आज सायंकाळी ऐतिहासिक बिंदू चौकात भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून ‘संविधान वाचवा’ची हाक देण्यासाठी शिवसैनिकांनी घंटानाद करून सर्वांचे लक्ष वेधले. यावेळी शिवसेना उपनेते व जिल्हाप्रमुख संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, हर्षल सुर्वे, महिला संघटिका प्रतिज्ञा उत्तुरे, महेश उत्तुरे, करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List