सातारा जिल्ह्यात जल्लोषात भारतमातेचे पूजन
प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर, फलटण यांसह विविध ठिकाणी भारतमाता आणि संविधानपूजन सोहळा चैतन्यमय वातावरणात जल्लोषात पार पडला. महाबळेश्वर येथे माजी जिल्हाप्रमुख राजेश (बंडूशेठ) कुंभारदरे, यशवंत घाडगे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख राजश्री भिसे यांच्या उपस्थितीत शहरप्रमुख राजाभाऊ गुजर यांच्या नियोजनात संविधानपूजनाचा कार्यक्रम झाला.
यावेळी युवासेनेचे आकाश साळुंखे, आरोग्य सेनेचे अमोल साळुंखे, महिला आघाडीच्या वसुधा बगाडे, राजू साळवी, आवा पारठे, दत्तात्रय बावळेकर, गणेश भोसले, शाहनवाज खारकंडे, समीर तांबोळी, मिथिलेश कानडे, शंकर ढेबे, अल्लीभाई वारुणकर, एकनाथ मोरे, जयवंत साळुंखे, पापा शेख, चंद्रकांत पांचाळ आदी शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List