विधानसभा निवडणुकीत प्रचंड मोठा भ्रष्टाचार, अ‍ॅड. असीम सरोदे यांचा आरोप

विधानसभा निवडणुकीत प्रचंड मोठा भ्रष्टाचार, अ‍ॅड. असीम सरोदे यांचा आरोप

राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुका निःपक्षपणे पार पडल्या, असे म्हणण्याची परिस्थिती नाही. निवडणुकीतील अनेक उमेदवारांनी न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. यावरून या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला दिसून येत आहे आणि हे वास्तव नाकारता येत नाही, असे मत विधिज्ञ  अ‍ॅड. असीम सरोदे यांनी व्यक्त केले.

जागतिक मतदार दिनानिमित्त पुणे शहर काँग्रेसतर्फे राज्यघटनेने निवडणूक आयोगाला दिलेली स्वायत्तता अबाधित राखून निवडणुकीतील पक्षपात थांबवावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले. या वेळी अपर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अ‍ॅड. सरोदे बोलत होते. शहराध्यक्ष अरबिंद शिंदे, माजी आमदार रवींद्र धंगेकर, अ‍ॅड. अभय छाजेड, माजी आमदार दीप्ती चवधरी, प्रवक्ते गोपाळ तिवारी, माजी नगरसेवक रफिक शेख, अविनाश बागवे, लता राजगुरू, सुजाता शेट्टी, राज अंबिके, युवक अध्यक्ष सौरभ अमराळे उपस्थित होते.

अ‍ॅड. असीम सरोदे म्हणाले, विधानसभा निवडणुकीचा निकाल अनाकलनीय, अविश्वसनीय असल्याचे दिसून आले आहे. राज्यभरात भाजपा व महायुतीबद्दल प्रचंड नाराजी होती. अशा काळात अचानक एवढा मोठा जनाधार भाजपा व महायुतीला मिळावा हा मोठा अविश्वास निर्माण करणारा निकाल राज्याने पाहिला आहे. लोकशाही मार्गाने सरकार आल्याचे सांगायचे आणि यंत्रणांच्या मदतीने भ्रष्ट मार्गांचा वापर करायचा आणि ही लोकशाही असल्याचे सांगायचे अशा स्वरूपाचे नाटक सध्या सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत 50 लाख मतदार अचानक कसे वाढले हा महत्त्वाचा प्रश्न आहे. वाढलेला मतदारांचा डेटा हा संशयास्पद आहे, याबद्दल वारंवार आक्षेप घेण्यात आला. मात्र, याचे उत्तर निवडणूक आयोगाला देता आलेले नाही.

निवडणूक आयोग हा भाजपच्या फायद्यासाठी काम करत असल्याचे केवळ रस्त्यावरच नाही तर न्यायालयातही जाहीरपणे बोलले जात आहे. निवडणूक आयोगाबरोबरच न्यायव्यवस्थेतही काही वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत. या वाईट प्रवृतीच्या लोकांना काढून टाकले तर यंत्रणा स्वच्छ होऊ शकते आणि ते मोठे आव्हान आपल्यासमोर असल्याचेही सरोदे यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

चिनी सायबर स्कॅमर्सच्या मदतीने करोडो रुपये लुटले, जोधपूरमध्ये चौघांना अटक चिनी सायबर स्कॅमर्सच्या मदतीने करोडो रुपये लुटले, जोधपूरमध्ये चौघांना अटक
चिनी सायबर स्कॅमर्सच्या मदतीने करोडोंची फसवणूक केल्याप्रकरणी जोधपूरमध्ये चौघांना अटक केली आहे. विशेष म्हणजे या टोळीचा म्होरक्या एक दहावीचा विद्यार्थी...
Mahakumbh 2025 – ‘सनातन धर्म हाच आपला राष्ट्रधर्म’, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे मत
उरण पाठोपाठ नांदेड जिल्ह्यातही बर्ड फ्लूचा शिरकाव, मृत कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह, दहा किमी परिसरात हाय अलर्ट
OnePlus चा ‘हा’ टॅब पहिल्यांदाच मिळत आहे 19,749 रुपयांमध्ये, किंमत आहे 40 हजार; जाणून घ्या काय आहे ऑफर
Hero Xpulse 210 ची बुकिंग आणि डिलिव्हरी कधी होणार सुरू? किंमत किती? जाणून घ्या संपूर्ण माहिती
Australian Open 2025 – यानिक सिनरने सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले, अंतिम फेरीत झ्वेरेवचा केला पराभव
जो भावाचा नाही झाला, तो आमचा काय होणार? गनिमी कावा करणार; भरतशेठ गोगावले यांचं मोठं विधान