Padma Award 2025 – डॉ. विलास डांगरे, मारुती चितमपल्ली यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार 2025 ची घोषणा करण्यात आली. पद्म पुरस्कार देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक आहे. पद्म विभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणींमध्ये हे पुरस्कार दिले जातात. यंदा महाराष्ट्रातील प्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्काराने सम्मानीत करण्यात आले आहे. डॉ. डांगरे यांची विदर्भात वैद्यकीय सेवेतले भीष्म पितामह, अशी ओळख आहे. गेल्या 50 वर्षात त्यांनी आपल्या वैद्यकीय सेवा देत एक लाखाहून अधिक रुग्णांना बरं केलं आहे.
डॉ. विलास डांगरे यांच्यासह साहित्यिक मारुती चितमपल्ली यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. चितमपल्ली यांना वन्यजीव संवर्धन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List