दिंडोशीतील भीषण आगीत 6 गोदामे खाक, सुदैवाने जीवितहानी टळली
दिंडोशी खडकपाडा परिसरात फर्निचरच्या गोदामाला आग लागल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली. या गोदामामध्ये संपूर्ण लाकडी सामान असल्यामुळे बघता बघता आग झपाटय़ाने पसरली. या आगीत 5-6 गोदामे जळून खाक झाली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे सांगण्यात येते. मात्र आगीचे खरे कारण काय याबाबत स्थानिक पोलीस, अग्निशमन दलाचे संबंधित अधिकारी हे अधिक तपास करीत आहेत.
खडकपाडा येथील फर्निचर मार्पेटमध्ये आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीमुळे आसपासच्या परिसरात धुराचे लोट पसरले. त्यामुळे फर्निचर मार्पेटमध्ये एकच धावपळ झाली. लोक सैरावैरा पळू लागले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाडय़ा तातडीने घटना स्थळी दाखल झाल्या. आगीचा भडका पाहता अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रथमतः आग स्तर -1ची असल्याचे सकाळी 11.18 वाजता जाहीर केले. त्यानंतर आग आणखी भडकल्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी सदर आग स्तर-2ची असल्याचे सकाळी 11.24 वाजता तर आग स्तर-3ची असल्याचे सकाळी 11.48 वाजता जाहीर केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List