Padma Awards 2025 – मनोहर जोशी, पंकज उधास यांना मरणोत्तर पद्मभूषण, जाणून घ्या पद्म पुरस्कारांनी कोणा-कोणाचा सन्मान?
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार 2025 ची घोषणा करण्यात आली आहे असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच दिवंगत गायक पंकज उधास यांनाही पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. याशिवाय अभिनेते शेखर कपूर यांनाही पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
पद्म पुरस्कारांनी कोणा-कोणाचा सन्मान?
महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, सुलेखनकार अच्युत पालव, एसबीआयच्या माजी अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य, ज्येष्ठ गायिका अश्विनी भिडे- देशपांडे, बारीपाड्याचे वनसंरक्षक चैतराम पवार, ज्येष्ठ गायिका जसपींदर नरूला, अरण्यॠषी मारुती चितमपल्ली, ज्येष्ठ बासरीवादक रोणू तथा राणेंद्र भानू मजुमदार, कृषीतज्ज्ञ सुभाष शर्मा, चित्रकार वासुदेव कामत, ज्येष्ठ होमिओपॅथी तज्ञ डॉ विलास डांगरे या सर्वांना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List