Satara Accident – भरधाव कारची पादचाऱ्यांना धडक, एकाचा मृत्यू; चौघे जखमी
साताऱ्यातील वाई बसस्थानकात अपघाताची थरारक घटना समोर आली आहे. अनियंत्रित भरधाव कारने पाच पादचाऱ्यांना धडक दिली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून चौघे जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या चालकाला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी जखमींना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात नेले. याप्रकरणी पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे घटनेचा तपास करत आहेत. आरोपी चालकाची चौकशी पोलीस करत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List