Onion Benefits : लठ्ठपणामुळे त्रस्त आहात? झटपट वजन कमी करण्यासाठी ‘हा’ पदार्थ ठरेल फायदेशीर…
आजकाल अनेकजण जास्त प्रमाणात जंक फूडचे सेवन करतात. जंक फूडचे सेवन केल्यामुळे तुमचं वजन वाढते. जास्त प्रमाणात तेलकट खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरातील लठ्ठपणाच्या समस्या उद्भवू शकातात. लठ्ठपणामुळे तुम्हाला रक्तदाब, मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल सारख्या समस्या उद्भवतात. अनेकजण वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करतात. वजन कमी करण्यासाठी अनेकजण व्यायाम, जीम, डायट करतात. परंतु तुम्हाला जर झटपट वजन कमी करायचे असेल तर काही घरगुती उपाय करू शकता.
वजन कमी करण्यासाठी निरोगी आणि आणि नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का ? तुमच्या आहारामध्ये कांद्याचा समावेश केल्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. कांद्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि क्वेर्सेटिन असते ज्यामुळे तुमचे शरीर निरोगी राहाण्यास मदत होते. कांद्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडेंट्स असतात ज्यामुळे तुमच्या शरीरातील टॉक्सिन बाहेर काढण्यास मदत करते. कांदा तुमच्या शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते.
कांद्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्व असतात ज्यामुळे तुमच्या शरीरातील चयापचय वाढते. कांद्याचे सेवन केल्यास तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी वितळवण्यासाठी मदत करते आणि तुमचे वजन नियंत्रित राहाते. कांद्यामध्ये भरपूर प्रमाणात सल्फर आणि अँटी – बॅक्टेरियल गुणधर्म असतात ज्यामुळे तुमचं शरीर डिटॉक्सिफाई करण्यास मदत होते आणि तुमच्या शरीरातील हानिकारक विषारी पदार्थ बाहेर काढून टाकतात. कांद्यामध्ये मुबलक प्रमाणात असलेले फायबर तुमची पचनसंस्था निरोगी ठेवते आणि भूक नियंत्रित ठेवते. कांद्याचे नियमित सेवन केल्यामुळे तुमच्या केसांचे आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. कांद्याच्या रसामुळे तुमच्या केसांमधील कोंडा कमी होतो आणि तुमची केस घनदाट होतात. कांद्याच्या सेवनामुळे तुमची त्वचा देखील निरोगी राहाण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया तुम्ही कोणत्या पद्धतीने कांद्याचा आहारात समावेश करू शकता ?
कॅलरी बर्न होण्यास मदत
तुम्ही वजन कमी करण्यासाठी कच्च्या कांद्याची कोशिंबीर खाऊ शकता. कच्च्या कांद्याची कोशिंबीर खाल्ल्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते आणि तुमचे वजन नियंत्रित राहाण्यास मदत होते. त्यासोबतच तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी कांद्याच्या रसाचे सेवन करू शकता त्यामध्ये लिंबू आणि मध मिसळा ज्यामुळे तुमच्या चयापचय वाढते आणि कॅलरी बर्न होण्यास मदत होते. कांद्याच्या सूपमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते ज्यामुळे तुमच्या शरीराला पोषक तत्वं असतात. पालक, काकडी आणि पुदिन्यामध्ये कांदा मिसळून बनवलेली हिरवी स्मूदी शरीराला पोषण तर देतेच पण वजन कमी करण्यास देखील मदत करते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List