‘अप्पी आमची कलेक्टर’मध्ये अप्पीची भूमिका बदलणार? कथानकातील वळण पाहून प्रेक्षकांना शंका
'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. अप्पीचं संपूर्ण कुटुंब आसगावला पोहोचलंय. अमोलला गावात परतल्याचा खूप आनंद होतोय. तो शेतांमध्ये फिरतोय आणि गावातील ओळखीच्या जागांना भेट देतोय.
मात्र, एका अशुभ घटनेमुळे कुटुंबाची चिंता वाढली आहे. अमोलला अप्पीची आठवण येतेय आणि तिच्या विचारात अमोल मग्न आहे. त्याचवेळी अप्पी फोन करून ती लवकरच पोहोचत असल्याचं सांगते.
अप्पी प्रवासाला निघाल्यावर तिच्या गाडीचा डोंगराळ भागात अपघात होतो आणि ती खोल दरीत कोसळते. जेव्हा अप्पी वेळेवर पोहोचत नाही, तेव्हा संपूर्ण कुटुंब तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात. सगळ्यांना अपघाताबद्दल समजतं, पण ते अमोलला काहीच सांगत नाहीत.
अर्जुन घटनास्थळी धावतो, तर कुटुंब अमोलला घेऊन घरी परततं. अपघाताच्या ठिकाणी अर्जुनला कळतं की गाडी मोठ्या उंचावरून कोसळली आहे आणि स्फोट झाला आहे. ड्रायव्हरचा मृतदेह सापडतो, पण अप्पीचा कुठेही पत्ता लागत नाहीये.
हे पाहून अर्जुन खूपच खचतो. अप्पीचा अपघात आणि तिचा शोध सुरू असल्याची बातमी गावभर पसरते आणि अखेर अमोलला ही बातमी समजते. सर्वांना भीती वाटते की अमोल कशा प्रकारे प्रतिक्रिया देईल, पण तो शांतपणे सांगतो की त्याची आई नक्की परतेल.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List