उत्तम जानकर दिल्लीत EVM विरोधात आंदोलन करणार, संजय राऊत यांची घेतली भेट

उत्तम जानकर दिल्लीत EVM विरोधात आंदोलन करणार, संजय राऊत यांची घेतली भेट

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठकारे) नेते, खासदार संजय राऊत यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीनंतर उत्तम जानकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. ईव्हीएम विरोधात दिल्लीत आंदोलन करणार असल्याचे उत्तम जानकर यांनी सांगितले.

ईव्हीएमचा वापर करून महाराष्ट्राची वाट लावली. ईव्हीएम विरोधात मारकडवाडीसह इतर गावांमध्ये जो उठाव झाला, त्या पद्धतीचं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात आहे. याचा कुठे ना कुठेतरी शोध घेतला पाहिजे. दिल्लीची निवडणूक आहे. बिहारमध्ये आहे. या निवडणुकीत त्यांना पकडायचं, चोरा हा कुठे ना कुठेतरी पकडला जातोच. म्हणून आम्ही आलो. संजय राऊतसाहेब हे आमचे नेते आहेत. गेले अनेक वर्षे, अनेक दिवसांपासून ते लढाया करताहेत. जेलमध्ये सुद्धा त्यांना टाकून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला गेला. ते ज्या हिंमतीने लढले, त्याच हिंमतीने आम्ही लढतोय. परिणामाची चिंता न करता लढतोय. आज अरविंद केजरीवालसाहेब आणि मनोज कुमार झा यांना भेटणार आहोत. चर्चा करणार आहोत. 25 जानेवारीला निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस आहे. आणि त्या दिवशी जंतरमंतरवर आंदोलन करणार आहे. निवडणूक आयोग सशक्त असला पाहिजे. तो पारदर्शकर असला पाहिजे, असे उत्तम जानकर म्हणाले.

महाराष्ट्रात ज्या पद्धतीने यांनी मतांची चोरी केली. त्यामध्ये जिंकणारे पराभूत केले आणि पराभूत होणाऱ्यांना जिंकून टाकले. जे 10-5 हजाराने पराभूत होणार होते ते लाखाच्या फरकाने निवडून आले. जे लाखाच्या फरकाने जिंकून येणार होते ते बरेचसे पराभूत झाले. आणि माझ्यासारखे काठावर जिंकले. म्हणून दिल्लीत सगळ्यांच्या भेटीगाठी घेऊन आम्ही पुढचं धोरण ठरवू. मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांची उद्या भेट घेणार आहोत. आणि 25 तारखेला जंतरमंतरवर सत्याग्रह करू. काय घडलं महाराष्ट्रात? त्याचा डाटा संजय राऊतसाहेबांना दिला आहे. दिल्लीतील आंदोलनात कोण कोण असेल? हे आम्ही पत्रकार परिषद घेऊन जाहीर करू, असे उत्तम जानकर यांनी सांगितले.

महाराष्ट्रातला उद्रेक जंतरमंतरवर आंदोलन करून लोकांसमोर आणू- संजय राऊत

ईव्हीएमचा घोटाळा करून निवडणुका जिंकणं हा राष्ट्रद्रोह आहे. पण हा घोटाळा कशा पद्धतीने झाला, होतोय आणि लोकांचा उद्रेक काय आहे, हे उत्तमराव जानकर यांच्या मारकवाडी गावानं दाखवलं. पुढच्या महिन्यात जे अधिवेशन होईल त्या काळात महाराष्ट्रातला उद्रेक आहे, तो पुन्हा एकदा जंतरमंतरवर बसून आपण आंदोलन करू आणि लोकांसमोर आणू, असे संजय राऊत यावेळी म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महाराष्ट्राचा हरियाणा होतो आहे, लातूरच्या ऑनर किलींगवरुन प्रकाश आंबेडकर यांचा आरोप महाराष्ट्राचा हरियाणा होतो आहे, लातूरच्या ऑनर किलींगवरुन प्रकाश आंबेडकर यांचा आरोप
जे हरियाणात घडले ते आता महाराष्ट्रात होत आहे. माऊली सूत या १८ वर्षांच्या कॉलेज विद्यार्थ्यांचे रोहिणी हिच्याशी प्रेम संबंध जुळले....
महाराष्ट्राला मोठा धोका, ‘या’ दहशतवादी संघटनेचं 20 जिल्ह्यात नेटवर्क, केंद्रीय गुप्तचर खात्याचा इशारा
बर्ड फ्ल्यूचा कहर, चिकन खावे की खाऊ नये ?,प्रशासनाने काय केले आवाहन पाहा
ना पापाराझी, ना फॅन्स, कोणालाही सैफजवळ जाता येणार नाही; मुंबई पोलिसांकडून तगडी सुरक्षा
जळगावात मोठी दुर्घटना; आगीच्या भीतीनं पुष्पक एक्स्प्रेसमधून प्रवाशांच्या उड्या, समोरून येणाऱ्या रेल्वेनं काहींना उडवलं
Video ड्रायव्हरने चुकून रिव्हर्स मारला, पहिल्या मजल्यावरील पार्किंगमधून कार थेट खाली कोसळली
आपल्या देशात येणारे सक्षम लोकं आवडतात; डोनाल्ड ट्रम्प यांनी H1B व्हिसाबाबत स्पष्ट केली भूमिका