“तू माझा नवरा असो किंवा गोंविदा, मी चमचागिरी करणार नाही”, सुनिता अहुजा स्पष्टच बोलली

“तू माझा नवरा असो किंवा गोंविदा, मी चमचागिरी करणार नाही”, सुनिता अहुजा स्पष्टच बोलली

गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिता अहुजा यांच्यामधील वादाची चर्चा सध्या सर्वत्र होताना दिसतेय. तसेच बऱ्याच प्रसांगामधून आणि सुनिताने मुलाखतींमध्ये गोविंदाबद्दल काही गोष्टी स्पष्ट सांगितल्यामुळे या जोडीमध्ये काहीतरी बिनसलंय हे दिसून आलं. पण गोविंदाने यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

डेव्हिड धवन यांची बाजू घेत गोविंदाची चूक असल्याचं सुनिताने म्हटलं

गेल्या काही दिवसांपासून सुनिताच्या जुन्या मुलाखतींचे असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत ज्यात तिने गोविंदाच्या काही गोष्टी पटत नसल्याचं तिने सांगितलं होतं. अशाच एका मुलाखतीचा तिचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतं आहे.

या मुलाखतीत सुनिताने पती गोविंदा आणि दिग्दर्शक डेव्हिड धवन यांच्या नात्यात दुरावा का निर्माण झाला यावर भाष्य केलं आहे. तसंच या वादात तिने डेव्हिड धवन यांची बाजू घेत गोविंदाची चूक असल्याचं तिने म्हटलं. गोविंदा अद्यापही 90 च्या दशकात अडकला असून, त्याची मुलंही त्याचा सल्ला गांभीर्याने घेत नाहीत असंही ती म्हणाली आहे.

अभिनेत्यांभोवती त्यांचे चमचे फिरतात

एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सुनीता अहुजाने सांगितलं की, “मी नेहमीच म्हणते की, डेव्हिड माझ्या वडिलांसारखे आहेत. तो काळ असा होता की प्रसिद्ध अभिनेत्यांभोवती त्यांचे चमचे फिरत असत. ते नेहमी गैरसमज निर्माण करायचे. गोविंदाच्याबाबतीतही असंच काहीसं घडलं होतं.

डेव्हिड आणि गोविंदा यांच्यातील पार्टनरशिप पाहून अनेकांना मत्सर वाटायचा. जेव्हा तुमच्या आजुबाजूला फक्त नकारात्मक लोक असतात तेव्हा ती नकारात्मकता कुठेतरी तुमच्यातही येते” असं तिने म्हटलं.

‘गोविंदाने बदलत्या वेळेसह स्वत:मध्ये बदल करणे गरजेचं’

सुनिता अहुजाने यावेळी डेव्हिड धवन यांची बाजू घेत म्हटलं “त्यांनी कधीच गोविंदाला काही वाईट म्हटलं नाही. याऊलट गोविंदाने बदलत्या वेळेसह स्वत:मध्ये बदल करणे गरजेचं आहे आणि तोच सल्ला तेही त्याला देत होते. डेव्हिडने कधीच काही चुकीचं म्हटलं नाही. त्यांचं म्हणणं होतं की, 90 च्या दशकात एकट्या अभिनेत्याचे चित्रपट चालायचे, पण आता तसं होत नाही. आता फार कमी असे चित्रपट चालतात. डेव्हिडने गोविंदाला सेकंड लीड चित्रपट स्विकारण्याचा सल्ला दिला होता. त्याने बडे मियाँ, छोटे मियाँ चित्रपटात सेकंड लीडची भूमिका निभावली होती आणि ती काही वाईट नव्हती”, असं म्हणत तिने गोविंदाने स्वत: मध्ये बदल करायला हवेत असंही म्हटलं आहे.

पुढे ती म्हणाली की, “गोविंदाच्या आजुबाजूला असणारे लोक त्याला उसकवत असत की, तूच हिरो आहेस. या गोष्टी कशा घडल्या हे पाहून मला फार राग येतो. गोविंदाच्या आजुबाजूला असणारे लोक चांगले नव्हते. त्यांनी त्याला डेव्हिडच्या विरोधात नेलं,” अशी खंत सुनिता अहुजाने व्यक्त केली आहे.

नवरा असला तरी चमचागिरी करणार नाही

दरम्यान ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये गोविंदाने आपण तीन चित्रपटांमधून कमबॅक करत असल्याची घोषणा केली. त्यावही सुनिताने भाष्य करत म्हटलं “मला वाटतं की त्याने तीन चित्रपट करण्याबद्दल काही घोषणा केल्या आहेत. पण जोपर्यंत मी प्रोजेक्टबद्दल ऐकत नाही तोपर्यंत मी ठाम मत देऊ शकणार नाही”असही तिने स्पष्ट केलं.

दरम्यान तिने तिच्या स्वभावाबद्दलही सांगितलं की, “मी चांगलं की वाईट असेल ते तोंडावर सांगते. तू माझा नवरा असो किंवा गोंविदा, मी चमचागिरी करणार नाही. मी ‘वाह वाह’ प्रोडक्शन नाही, मी ‘सही सही’ प्रोडक्शन आहे,” असं ती म्हणाली. सुनिताच्या अनेक मुलाखतींमधून तिला गोविंदाच्या काही गोष्टी पटत नसल्याचं स्पष्टपणे तिने सांगितल्या आहेत.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आकलन क्षमता कमी असलेल्या महिलेला आई होण्याचा अधिकार नाही का ? मुंबई उच्च न्यायालयाने फटकारलं आकलन क्षमता कमी असलेल्या महिलेला आई होण्याचा अधिकार नाही का ? मुंबई उच्च न्यायालयाने फटकारलं
ज्या महिलेची आकलन क्षमता कमी आहे तिला आई होण्याचा अधिकार नाही का ? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी उपस्थित...
भाजपा प्रदेशाध्यपदाची माळ कुणाच्या गळ्यात की चंद्रशेखर बावनकुळे यांच्याच खांद्यावर धुरा? स्थानिक स्वराज्य निवडणुकीपूर्वी कोणते मिशन?
दाभाडे कुटुंबाची इरसाल गोष्ट; खळखळून हसवणाऱ्या ‘फसक्लास दाभाडे’चा धमाकेदार ट्रेलर
हंसिका मोटवानीच्या वहिनीने सासू, नणंद अन् पतीविरोधात दाखल केला FIR; नेमकं काय आहे प्रकरण?
उदित नारायण यांच्या इमारतीला आग, एकाने गमावले प्राण; घटनेचा व्हिडीओ व्हायरल
पुनर्वसनात पती-पत्नीला दोन घरे मिळणार नाहीत, हायकोर्टाचा निर्वाळा; स्वतंत्र झोपडीचा दावा फेटाळला
मुंबईत घर मिळण्याची गिरणी कामगारांची आशा पल्लवित, वरळीतील पाच एकरचा भूखंड महापालिकेकडेच राहणार