नितीश कुमार यांचा भाजपला मोठा धक्का; विरोधी बाकांवर बसण्याचा निर्णय घेतला, मणिपूर मधून दिला संदेश
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जनता दल (युनायटेड) ने मणिपूरमधील एन. बिरेन सिंह यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे आणि त्यांचा एकमेव आमदार हा आता विरोधी बाकांवर बसणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एनडीटीव्हीने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले आहे. या घडामोडीचा सरकारच्या स्थिरतेवर कोणताही परिणाम होणार नसला तरी, हा एक मजबूत संदेश जात असल्याचं बोललं जात आहे. जेडीयू केंद्रात आणि बिहारमध्ये भाजपचा प्रमुख मित्र आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List