Saif Ali Khan Attack – सैफच्या घरात CCTV मध्ये दिसलेला आणि अटक केलेला आरोपी वेगवेगळे? खरा हल्लेखोर अद्यापही मोकाट? फॉरेन्सिक तज्ज्ञांचा दावा

Saif Ali Khan Attack – सैफच्या घरात CCTV मध्ये दिसलेला आणि अटक केलेला आरोपी वेगवेगळे? खरा हल्लेखोर अद्यापही मोकाट? फॉरेन्सिक तज्ज्ञांचा दावा

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर 16 जानेवारीच्या रात्री चाकूहल्ला झाला. यानंत सकाळी संशयित आरोपीचे सीसीटीव्ही फुटेज जारी करण्यात आले. तीन दिवसांनी म्हणजे 19 जानेवारीला सैफवरील हल्लेखोर मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याला अटक केल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले. पण अटक केलेला आरोपी आणि सैफ अली खानच्या घरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असलेला आरोपी जुळत नसल्याची चर्चा सोशल मीडियात सुरू आहेत. त्यामुळे शरीफुल हाच सैफवर हल्ला करणारा खरा आरोपी आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अटक केलेला शरीफुल आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असलेला संशियत या दोन्ही फोटोंची फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून तपासणी करण्यात आली. दोघांचे फोटोग्राफ रिकग्निशन अ‍ॅनालिसिस केल्यावर दोघांच्या फोटोंमध्ये फरक दिसून येतो. चेहऱ्याच्या आकारापासून ते डोळे आणि ओठांची बनावट अजिबात जुळत नाही. म्हणजेच दोन्ही फोटो एकाच व्यक्तीची नाहीत, असे फॉरेन्सिक तज्ज्ञ डॉ. आदर्श मिश्रा यांनी म्हटले. ‘दैनिक भास्कर’ने हे वृत्त दिले.

सर्विलन्स आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर आरोपी शहजाद याला अटक केल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले. पण आरोपी शहजादचा आणि सीसीटीव्हीमध्ये दिसत असलेला आरोपीमध्ये खूप फरक आहे. दोघांच्या हेअर स्टाइलमध्ये फरक आहे. यानेच सैफवर हल्ला केला होता का? असा प्रश्न पोलिसांना विचारण्यात आला होता. यावर या प्रकरणी तपास सुरू असल्याचे उत्तर पोलिसांनी दिले होते. पोलिसांनी या प्रकरणात दोन ते तीन जणांना ताब्यात घेतले होते. पण चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आले. शहजाद याला अटक केली असतली तरी त्याच्या हातांचे ठसे जुळले का? सैफ त्याची ओळख पटवत नाही तोपर्यंत, हे चित्र स्पष्ट होणार नाही.

सैफच्या घरात आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लामच्या हातांचे अनेक ठसे मिळाले आहेत. जिथू तो आतमध्ये त्या बाथरूमच्या खिडकीवरील ठशांचाही समावेश आहे. तसेच डक्ट शॉफ्टमधूनही त्याच्या हातांचे ठसे मिळाल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे. पण तरीही काही प्रश्न उपस्थित होत आहेत. सैफ घरात एक व्यक्ती रात्री पावणेदोनच्या सुमारास तोंडावर कपडा बांधून आणि पाठीवर बॅग घेऊन जिना चढताना दिसत आहेत. त्याने पायात काहीच घातलेलं नाही. हा फुटेज सातव्या मजल्यावरून आठव्या मजल्यावर जातानाचे आहे. दुसऱ्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये रात्री अडीच वाजेच्या सुमारास तीच व्यक्त जिन्याने उतरताना दिसतेय. त्याचे कपडे आणि पाठीवर बॅग पहिल्यासारखेच आहेत. पण यावेळी त्याचा चेहरा दिसत होता. लांब केस आणि पायात बुट होते. ही दोन्ही फुटेज फॉरेन्सिक तज्ज्ञांना दाखवण्यात आली. पोलिसांनी ज्या आरोपीला अटक केली आहे तो खरा नाहीये. हे सहज उलगडता येईल, असा दावा फॉरेन्सिक तज्ज्ञ डॉ. बी. एन. मिश्रा यांनी केला.

जिन्याच्या रेलिंगवर असलेल्या हाताच्या ठशांवरून पकडण्यात आलेल्या आरोपीच हाताचे ठसे जुळल्यास तो घटनेच्यावेळी तिथे होता की नाही, हे सहज कळू शकतं. कारण सैफवर हल्ला केल्यानंतर त्याच्या हाताला रक्ताचे डाग लागले असणार, हे डाग रेलिंगवरही असतील, असे फॉरेन्सिक तज्ज्ञ डॉ. बी. एन. मिश्रा म्हणाले. डक्ट एरियातून आरोपी आला होता. त्यामुळे तिथेही त्याच्या हाताचे ठसे उमटलेले असणार. तिसरा महत्त्वाचा मुद्दा… आरोपीने सैफवर हल्ला केला. त्यानंतर आरोपीचे कपडे आणि त्याच्या शरीरावर सैफच्या रक्ताचे डाग नक्की असतील. त्या कपड्यांवरील रक्ताचे डाग आणि चाकूवरील हाताचे ठसे जुळले तर खरा आरोपी ओळखणं सहज सोपं आहे, असे फॉरेन्सिक तज्ज्ञ डॉ. बी. एन. मिश्रा म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Ladki Bahin Yojana :  अपात्र असूनही पैसे घेतलेल्या महिलांबाबत सरकारचा मोठा निर्णय; लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात मोठी अपडेट Ladki Bahin Yojana : अपात्र असूनही पैसे घेतलेल्या महिलांबाबत सरकारचा मोठा निर्णय; लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात मोठी अपडेट
ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा महिलांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशानं राज्य सरकारने गेल्या वर्षी...
‘जोपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेत नाहीत तोपर्यंत अजित पवारांना राज्यात फिरू देऊ नका’; मराठा नेता आक्रमक, म्हणाला दगडं घेऊन…..
मुख्यमंत्र्‍यांच्या त्या शब्दांमुळे मी शांत आहे, जरांगे पाटील यांचा गर्भीत इशारा
‘सैफच्या आईनं हात जोडून’…जीव वाचवणाऱ्या रिक्षाचालकाला सैफ अली खान भेटला; नेमका काय झाला दोघांमध्ये संवाद, पाहा व्हिडीओ
पहिल्या सिनेमातून रवीना टंडनच्या लेकीला मिळालं यश, अभिनेत्री मानले साईबाबांचे मानले आभार…
वजन कमी करण्यासाठी उकडलेल्या तांदळाचे पाणी ठरेल फायदेशीर, वजन कमी होण्यासोबतच बीपी राहील नियंत्रणात
डोनाल्ड ट्रम्प आले…शेअर बाजार घसरला; आणखी घसरणीची शक्यता, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…