गौरीची ‘ती’ अवस्था पाहून लग्नाच्या पहिल्याच रात्री शाहरूख खान ढसा ढसा रडला होता; असं काय घडलं होतं?
बॉलीवूडमधला किंग खानला कोणत्याही ओळखीची गरज नाही. बॉलिवूडचा बादशाह असलेला शाहरूख खान चित्रपटांच्याबाबतीतही खरा बादशाह आहे. शाहरूखने त्याच्या मेहनतीच्या बळावर बॉलिवूडमध्ये बक्कळ कमाई आणि नाव कमावलं. सर्वात श्रीमंत अभिनेता असण्यासोबतच लोकप्रिय अभिनेता म्हणूनही शाहरुखची ओळख आहे.
शाहरूख खान ढसा ढसा का रडला होता?
शाहरूख खानच्या बॉलिवूडप्रमाणेच वैयक्तिक आयुष्यही नेहमीच चर्चेत राहिल आहे. मग त्याच्याबद्दलचे किस्से असो किंवा त्याच्या कुटुंबाबद्दलचे किस्से असो. शाहरुखसोबतच त्याची पत्नी गौरी खान देखील बरीच चर्चेत असते. इंटिरियर डिझायनर असण्यासोबतच ती निर्माती देखील आहे.
पण शाहरूख खानचा एक किस्सा कदाचितच कोणाला माहित असेल की, शाहरुख त्याच्या लग्नाच्या पहिल्याच रात्री ढसा ढसा रडला होता. गौरी खान आणि शाहरुखच्या लव्हस्टोरीबद्दल सर्वांनाच माहित आहे. 1991 मध्ये या दोघांनी लग्न केलं होतं. पण मधुचंद्राच्या रात्री असं काही घडलं होतं की तो खूप रडला होता. काय होता हा किस्सा जाणून घेऊयात.
शाहरुख मधुचंद्राच्या रात्री बायकोला खोलीत एकटीला सोडून गेला होता. पण त्या रात्री त्याने परत येऊन जेव्हा गौरीची अवस्था पाहिली त्यावेळी तो ढसाढसा रडू लागला होता.
शुटींगच्या सेटवर घडला किस्सा
शाहरुख खानने गौरीशी लग्न केले तेव्हा तो बॉलिवूडमधील त्याचा सुरुवातीचा टप्पा होता. त्यावेळी त्याचा संघर्षाचा काळ सुरु होता आणि तो ‘दिल आशना है’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. या चित्रपटाच्या निर्मात्या आणि दिग्दर्शिका हेमा मालिनी होत्या. शाहरुख आणि गौरीचे लग्न मुंबईबाहेर झाले होते.
शाहरुख त्या काळात मुंबईत एका फ्लॅटमध्ये राहत होता. मात्र शाहरुखच्या मित्राने त्याच्यासाठी हॉटेलमध्ये रूम बुक केली होती. जेव्हा गौरी आणि शाहरुख लग्न करून परतले तेव्हा शाहरुखला वाटले की आपण हेमा मालिनी यांना मुंबईत आल्याचे सांगावे. त्याने ही बातमी हेमाला दिली. मात्र हेमा मालिनी यांनी त्यांना लगेच सेटवर येण्यास सांगितले होते.
गौरीची ती अवस्था पाहून शाहरुख रडला
हेमा मालिनी यांनी बोलावल्यानंतर शाहरुख पत्नी गौरीसोबत सेटवर पोहोचला. मात्र, हेमा सेटवर हजर नव्हती. बराच वेळ हेमाची वाट पाहिली पण ती आली नाही. त्यानंतर अभिनेत्याने पत्नीला मेकअप रूममध्ये बसवले. यानंतर शाहरुख खान रात्री 2 वाजता परतला.
दागिने आणि मेकअप तसाच ठेवून नववधू असलेल्या गौरी तिथल्याचं एका खुर्चीवर बसल्याबसल्या झोपी गेली होती. आपल्या लग्नाच्या रात्रीचा किस्सा सांगताना शाहरुख म्हणाला होता, त्या दिवशी मला माझ्या निर्णयाचा खूप राग आला होता. आमच्या लग्नानंतरची ती पहिली रात्र होती.
ज्या दिवशी गौरीला खूप मच्छर असलेल्या खोलीमध्ये वाट पाहत घालवावी लागली होती. मी गौरीला उठवलं आणि तिला काहीच न बोलता हॉटेलच्या रुमवर घेऊन आलो. त्या रात्रीची माझ्या आयुष्यात खूप मोठी भूमिका होती”. असं म्हणतं त्याने त्या प्रसंगाचं फार वाईट वाटल्याचं सांगितलं होतं. यामुळेच शाहरूख रडू आवरलं नसल्याचं त्याने सांगितलं.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List