“त्यांच्यावर उधारी होती म्हणून..”; प्रायव्हेट व्हिडीओ लीकवरून पुन्हा बरळली उर्वशी
अनेक सौंदर्यस्पर्धा जिंकलेली अभिनेत्री उर्वशी रौतेला सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. क्रिकेटर ऋषभ पंतसोबतचं अफेअर असो किंवा मग अभिनेता सैफ अली खानवरील चाकूहल्ल्यानंतर केलेलं अजब वक्तव्य असो.. उर्वशी नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकते. गेल्या वर्षी जून महिन्यात तिचा प्रायव्हेट बाथरुम व्हिडीओ ऑनलाइन लीक झाला होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत उर्वशीने त्या व्हिडीओवर मौन सोडलं आहे. मात्र उर्वशीने तिच्या प्रायव्हेट व्हिडीओबाबत जी प्रतिक्रिया दिली आहे, ती ऐकून नेटकऱ्यांनी डोक्यालाच हात लावला आहे.
‘बॉलिवूड बबल’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत उर्वशीने स्पष्ट केलं की लीक झालेला बाथरुम व्हिडीओ हा तिच्या ‘घुसपैठियाँ’ या चित्रपटाचाच एक भाग होता. याविषयी ती म्हणाली, “चित्रपटाच्या दिग्दर्शकांवर काही कर्ज होता आणि त्यांनी उधारी घेऊन ठेवली होती. यासाठी त्यांना त्यांची जमीनसुद्धा विकावी लागली होती. ते अक्षरश: रस्त्यावर आले होते. अशा परिस्थितीत त्यांनी माझ्या बिझनेस मॅनेजरशी त्या व्हिडीओबद्दल चर्चा केली होती. लीक झालेला व्हिडीओ हा चित्रपटातील एक सीन होता, आम्ही त्यासाठी वेगळी काही शूटिंग केली नव्हती. त्यांनी आमची परवानगी घेतली आणि त्यानंतर तो व्हिडीओ आधी लीक करण्यात आला होता. मुलींशी कशापद्धतीने सजग असायला हवं, याबद्दल जागरुकता निर्माण करणारा तो व्हिडीओ होता.”
प्रायव्हेट बाथरुम व्हिडीओ लीक करून कोणत्या पद्धतीची जागरुकता निर्माण केली जाऊ शकते, असा प्रश्न नेटकरी उपस्थित करत आहेत. उर्वशी चर्चेत राहण्यासाठी काहीही करू शकते, असंही नेटकऱ्यांनी म्हटलंय. नुकत्याच दिलेल्या आणखी एका मुलाखतीत जेव्हा तिला सैफवरील चाकूहल्ल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा ती अचानक आईवडिलांकडून मिळालेल्या महागड्या भेटवस्तूंबद्दल बोलू लागली होती. यावरूनही नेटकऱ्यांनी तिला प्रचंड ट्रोल केलं होतं. अखेर उर्वशीने सोशल मीडियावर पोस्ट लिहित जाहीर माफी मागितली होती.
उर्वशी तिच्या ‘डाकू महाराज’ या चित्रपटातील गाण्यामुळेही चर्चेत आहे. यामध्ये तिने नंदमुरी बालकृष्ण यांच्यासोबत डान्स केला. या डान्सचे अजब स्टेप्स पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं. मात्र माझ्यासाठी ती एक कला आहे, असं म्हणत उर्वशीने ट्रोलर्सना उत्तर दिलं होतं.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List