‘अप्पी आमची कलेक्टर’मध्ये अप्पी-अर्जुनची राजकारण्यांशी लढाई; कथा रंजक वळणावर
झी मराठी वाहिनीवरील 'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणार येऊन पोहोचलं आहे. अमोलच्या आजारनंतर तो पहिल्यांदा शाळेत जायला लागला आहे. संपूर्ण कुटुंब त्याला मदत करण्यासाठी आपापल्या जबाबदाऱ्यांची वाटणी करतात.
अमोलचे त्याचे मित्र शाळेत घेऊन जाण्यास येतात आणि सर्वांना तो सामान्य जीवन जगताना बघून खूप आनंद होतो. मात्र शाळेत काही मुलं अमोलला केस नसण्यावरून चिडवतात. हे पाहून अमोलचे मित्र रागावतात, पण अमोल शांतपणे सर्वांना खेळ सुरू ठेवायला सांगतो.
अमोल आणि त्याचे मित्र तो खेळ जिंकतात. घरातले शाळेतील छेडछाड संदर्भातील घटना ऐकतात आणि काळजी करतात. रुपाली अमोलला होमस्कूलिंग करण्याचा सल्ला देते. पण अप्पी आणि अर्जुन त्याच्या विरोधात आहेत, कारण त्यांचा विचार आहे की शाळेचे शिक्षण अमोलच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे.
ते अमोलच्या शाळेला भेट देण्याचा निर्णय घेतात. इकडे एका सूत्राच्या टिपनुसार अर्जुन एका गोदामात धाड टाकतो, जिथे बालमजुरी करणाऱ्यांना फसव्या ओळखपत्रांखाली राबवलं जात आहे. तो आरोपींना अटक करून त्या लहान मुलांना मुक्त करतो.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List