Saif Ali Khan : सैफ अली खान याच्या दोन सुरक्षा रक्षकांनी केले हल्लेखोराचे काम सोपे, मुंबई पोलिसांचा धक्कादायक दावा, आरोपी घरात असा घुसला
अभिनेता सैफ अली खान हा रुग्णालयातून दुसऱ्या घरी पोहचला आहे. तो तंदुरुस्त असल्याचे कालच्या दृश्यातून समोर आले आहे. 16 जानेवारी भल्या पहाटे घरात घुसून त्याच्यावर हल्लेखोराने सहा वार केले होते. त्यानंतर चार दिवस आरोपी शरिफुल इस्लाम शहजाद हा मुंबई पोलिसांना गुंगारा देत होता. ठाण्यातून त्याला पोलिसांनी अटक केली होती. त्याला अटक केल्यानंतर आता एका मागून एक धक्कादायक खुलासे समोर येत आहे.
सहा दिवसानंतर सुट्टी
अभिनेता सैफ खान याच्यावर 16 जानेवारी रोजी रात्री 2-2:30 वाजेदरम्यान हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर त्याला तात्काळ लीलावती रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्याच्या पाठीत रुतलेला चाकूचा तुकडा बाहेर काढण्यात आला होता. पोलिसांनी तपास करुन बांगलादेशी नागरिक शरीफुल इस्लाम शहजाद याला अटक केली. तर सैफ अली खान याला सहा दिवसानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
सुरक्षा रक्षकांची चूक भोवली
पोलिसांनी इतक्या उच्चभ्रू सोसायटीत हा भुरटा चोर घुसलाच कसा याची सखोल चौकशी केली. तेव्हा त्यांना धक्कादायक बाब समोर आली. आरोपीनेच या गोष्टीचा खुलासा केला. सैफ अली खान याच्या वांद्रे येथील सदगुरू शरण या इमारतीत आपण शिरलो, तेव्हा दोन्ही सुरक्षा रक्षक झोपल्याची माहिती त्याने पोलिसांनी दिली. घटनेच्या दिवशी दोन सुरक्षा रक्षक हे कर्तव्यावर होते. जेव्हा हल्लेखोर इमारतीत शिरला, तेव्हा दोन्ही सुरक्षा रक्षक ढाराढूर झोपले होते. त्यामुळे आता रात्र पाळीतील दोन्ही सुरक्षा रक्षक रडारवर आले आहेत. त्यांच्या एका चुकीमुळे सर्व यंत्रणाच कामाला लागल्याचे समोर आले आहे.
आरोपीने केली ही चालाखी
या इमारतीत शिरण्यासाठी आणि कोणती ही गडबड उडू नये यासाठी शहजाद याने एक चालाखी केली. त्याने त्याच्या पायातील बूट काढून बॅगमध्ये ठेवले. त्याचवेळी त्याने त्याचा मोबाईल सुद्धा बंद केले. या इमारतीच्या काही भागात सीसीटीव्ही नसल्याचे समोर आले आहे. या इमारतीत दोन सुरक्षा रक्षक आहेत. एक केबिनमध्ये तर दुसरा इमारतीच्या मुख्य द्वाराजवळ असतो. पण घटनेच्या दिवशी दोन्ही पण गाढ झोपेत असल्याचे समोर आले आहे.
हल्लेखोर सैफ खान याच्या माळ्यावर आला. तेव्हा त्याला बाथरूमची खिडकी उघडी दिसली. याठिकाणी दिवा सुरू दिसला. त्याच खिडकीतून तो घरात दाखल झाला. त्याला पाहून स्टाफ नर्स ओरडली. त्यानंतर सैफने तिथे धाव घेतली. सैफने त्याला काबूत करण्याचा प्रयत्न केला असता, त्याने चाकूने वार केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List