मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अधिकाऱ्यांना टार्गेट, अधिकारी नव्हे कर्मचाऱ्यांनाही करावी लागणार कामे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अधिकाऱ्यांना टार्गेट, अधिकारी नव्हे कर्मचाऱ्यांनाही करावी लागणार कामे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंगळवारी झाली. महाराष्ट्रात सापडलेल्या एचएमपीव्ही व्हायरसच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत आरोग्य विभागाला सतर्क राहण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यानंतर राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, विभागीय आयुक्त, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिसीद्वारे संवाद साधला. यावेळी अधिकाऱ्यांना टार्गेट दिले. हे टार्गेट स्थानिक कार्यालयापर्यंत असल्यामुळे कर्मचाऱ्यांनीही आता कामे करावी लागणार आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 100 दिवसांत प्राधान्याने करावयाची कामे सांगितली. ही कामे विभागासोबत आता स्थानिक कार्यालयांना सुद्धा करावी लागणार आहे. स्थानिक कार्यालयांना 100 दिवसांचे टार्गेट दिले गेले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, आपल्या विभागाच्या वेबसाईट सुसज्ज करा, माहिती अधिकारात मागितली जाते ती सर्व माहिती त्यावर आधीच टाका.

कागदांचे ढिग रिकामे करा…

कार्यालयांची सफाई करा, अनावश्यक कागदांचे ढिग रिकामे करा. पेंडिंग कामांची संख्या शून्यावर कशी येईल, त्याचा प्रयत्न करा. वाहनांचे भंगार साफ करा. कार्यालय स्वच्छ ठेवा. पिण्याचे पाणी, सार्वजनिक प्रसाधनगृह स्वच्छ राहतील, हे सुनिश्चित करा. अधिकाऱ्यांच्या सरप्राइज भेटी होतील, त्यावेळी ते स्वच्छ दिसले पाहिजे.

लोकशाही दिनासारखे उपक्रम राबवा

नावीन्यपूर्ण उपक्रम आपल्या कार्यालयात करा. सामान्य माणूस कोणत्या वेळेत भेटायला येऊ शकतो, त्याची सुस्पष्ट माहिती पाटीवर नमूद करा. 90% बाबी स्थानिक पातळीवर सुटू शकतात. पण ते होत नाही, म्हणून मंत्रालयात गर्दी होते. लोकशाही दिन सारखे उपक्रम राबवा. गुंतवणुकीसाठी लोक येतात, तेव्हा त्यांना कुणीही त्रास देणार नाही, हे सुनिश्चित करा. हे केवळ उद्योग विभागाचे काम नाही तर क्षेत्रीय अधिकारी यांचेही काम आहे.

पालक सचिवांना आदेश

फ्लॅगशिप कार्यक्रम/योजनांना भेटी तसेच तालुका, गाव पातळीवर भेटी झाल्याच पाहिजेत. शाळा, अंगणवाडी आणि आरोग्य केंद्र येथे भेटी झालेच पाहिजे. ही सर्व कामे होत आहेत की नाही, याकडे पालक सचिवांनी लक्ष द्यावे, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

फडणवीसांचा शिलेदार अडचणीत? लक्ष्मण हाकेंनी सांगितलं वाल्मिक कराड यांचं धस कनेक्शन, मोठा दावा फडणवीसांचा शिलेदार अडचणीत? लक्ष्मण हाकेंनी सांगितलं वाल्मिक कराड यांचं धस कनेक्शन, मोठा दावा
छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल ओबीसी समाजाच्या वतीनं  संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच निदर्शन आंदोलन करण्यात...
बाप-लेकीला सोडून दादांसोबत चला, शरद पवार गटाच्या खासदारांना तटकरे यांचा सल्ला?
‘अप्पी आमची कलेक्टर’मध्ये अप्पी-अर्जुनची राजकारण्यांशी लढाई; कथा रंजक वळणावर
‘तुम्ही इमर्जन्सी हा चित्रपट पहायला हवा’; कंगना यांचं ऐकताच प्रियंका गांधींनी दिलं असं उत्तर
रॅबिट फीव्हर म्हणजे काय? लक्षणे कोणती? जाणून घ्या
या लोकांसाठी ओला मटार म्हणजे विषासमान; चुकूनही खाऊ नका अन्यथा…
Video – अजितदादांच्या पक्षातील प्रमुख नेते साहेबांचा आदर करतात, तटकरेंचं सांगता येत नाही!