Saif Ali Khan attack : हल्ल्यापूर्वी नोकरी सोडली, चाकूही चोरला, सैफच्या हल्लेखोराबद्दल धक्कादायक माहिती उघड

Saif Ali Khan attack  : हल्ल्यापूर्वी नोकरी सोडली, चाकूही चोरला,  सैफच्या हल्लेखोराबद्दल धक्कादायक माहिती उघड

अभिनेता सैफ अली खानवर घरात घुसलेल्या चोराने जीवघेणा हल्ला केल्याच्या घटनेला आठवड्याभराचा कालावधी आता उलटला आहे. हल्ल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या सैफला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं तेथे त्याच्यावर शस्त्रक्रियाही झाली. त्याची प्रकृती आता सुधारली असून अखेर काल (मंगळवारी) सैफला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आणि तो त्याच्या घरी परतला. सध्या त्याला बेडरेस्ट सांगितली असून महिन्याभरात तो बरा होईल असे समजते. दरम्यान सैफवर ज्याने हल्ला केला तो आरोपी मोहम्मद शरीफुल याला रविवारी पहाटे ठाण्यातील लेबर कॅम्प परिसरातून अटक करण्यात आली. त्याला 23 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. द

दरम्यान याच शरीफुलबद्दल काही महत्वाचे खुलासे झाले आहेत. मूळचा बांगलादेशचा रहिवासी असलेला हा आरोपी भारतात आल्यानंतर काही काळ पश्चिम बंगालमध्ये रहात होता. त्यानंतर तिथे बोगस आधारकार्ड बनवून तो मुंबईत आला आणि येथे काम शोधू लागला. सैफवर हल्ला करण्याआधी तो एके ठिकाणी काम करत होता, मात्र हल्ल्याच्या काही दिवस आधीच त्याने हे काम सोडले होते अशी माहिती समोर आली होती. एवढेच नव्हे तर कामाच्या ठिकाणाहून आरोपीने एक चाकूही चोरला होता, तोच चाकू बॅगेत घेऊन तो वावरत होता अशी माहिती देखील उघड झाली आहे.

सैफवर हल्ला केल्यानंतर आरोपी त्याच्या घरातून पळून गेला, मात्र तो 2 तास सैफच्याच इमारतीच्या गार्डनमध्ये लपून बसला होता, त्यानंतर तो काही वेळासाठी वांद्रेच्या बँड स्टॅन्ड येथे गेला ,तेथे काही वेळ बसला. तेथून तो चालत चालत वांद्रे परिसरात पुन्हा आला आणि फरार झाला अशीही माहिती उघड झाली.

मोहम्मद शरीफुलची टोपी महत्वाचा पुरावा

मोहम्मद शरीफुलची टोपी महत्वाचा पुरावा ठरणार आहे असे समजते. जेव्हा मोहम्मद हा इमारतीच्या पायऱ्या चढून चालत गेला तेव्हा त्याने आपल्या बॅगेत टोपी ठेवली होती. मात्र सैफ अली खान च्या घरात जेव्हा झटापट झाली. तेव्हा त्याच्या डोक्यावर टोपी होती. त्यामुळे आता तीच टोपी ही महत्वाचा पुरावा ठरणार आहे. दरम्यान हल्लेखोर मोहम्मद  शरीफुलची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी फेशियल आयडी प्रणालीचा वापर केला असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

सैफ हल्ला प्रकरणातील तपास अधिकारी बदलला

सैफ अली खानवर हल्ल्याप्रकरणी तपास करणारा पोलीस अधिकारी बदलण्यात आला आहे. हा तपास अधिकारी का बदलला त्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.या प्रकरणाचा तपास पीआय दर्जाचे अधिकारी सुदर्शन गायकवाड करत होते. मात्र त्यांच्याऐवजी आता अजय लिंगनूरकर हे या प्रकरणाचा तपास करणार आहेत. नुकतीच त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता या प्रकरणातील तपास अधिकारी का बदलण्यात आले, त्यामागचे कारण काय, याची माहिती समोर आलेली नाही.

सैफ घरी आल्यावर फ्लॅटला लायटिंगचा झगमगाट

आठवडाभर रुग्णालयात घालवल्यानंतर आणि जीवघेण्या हल्ल्यातून वाचल्यानंतर सैफ अखेर काल घरी परतला. तो सुखरूप घरी परत आल्यानंतर सद्गुरू शरण या इमारतीतील त्याच्या फ्लॅटला लायटिंग करण्यात आल्याने सर्वत्र झगमगाट होता.  सैफ अली खान याच्या स्वागतासाठी १२ व्या मजल्याला लायटिंग करण्यात आली.  सैफ रुग्णालयात असल्याने 12 वा मजला मागचे काही दिवस अंधारात होता. आता सैफ अली खान आपल्या घरी परतल्याने खान फ्लॅट रोषणाईने झगमगत आहे.

लीलावती रुग्णालयातील स्टाफ सैफ अली खानच्या घरात दाखल

सैफ अली खानच्या घरात लीलावती रुग्णालयाचा स्टाफ दाखल झाला आहे. रुटीन चेकअप, ब्लड प्रेशर मापन आणि औषध वेळेवर देण्यासाठी स्टाफ आल्याची माहिती समोर आली आहे.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सैफ अली खान नव्या वादाच्या भोवऱ्यात, 15 हजार कोटी रुपयांची मालमत्ता सरकार ताब्यात घेण्याची शक्यता सैफ अली खान नव्या वादाच्या भोवऱ्यात, 15 हजार कोटी रुपयांची मालमत्ता सरकार ताब्यात घेण्याची शक्यता
अभिनेता सैफ अली खान याच्यावर काही दिवसांपूर्वी चकू हल्ला झाला होता. त्यामुळे अभिनेत्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 5...
“त्यांच्यावर उधारी होती म्हणून..”; प्रायव्हेट व्हिडीओ लीकवरून पुन्हा बरळली उर्वशी
रुग्णालयातून बाहेर पडताच सैफ इतका फिट कसा? संजय निरुपम यांचा सवाल
तमन्ना भाटिया नव्या लूकमध्ये दिसतेय हुबेहूब राजकुमारी, लाल ड्रेसमध्ये फुललं अभिनेत्रीचं सौंदर्य
एक चुप, सौ सुख..; पतीकडून अत्याचारानंतर अभिनेत्रीला सासरच्यांनी दिला अजब सल्ला
Mahakumbh – महाकुंभमेळ्यात आता ‘रबडी’वाले बाबा चर्चेत, दररोज 150 लिटर दुधाची बनवतात रबडी
Santosh Deshmukh Case – वाल्मीक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी