सैफ अली खान याच्या शरीरावर जखमा, चाहत्यांना पाहताच म्हणाला…, व्हिडीओ व्हायरल
Saif Ali Khan: अभिनेता सैफ अली खान याला 16 जानेवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. हल्लेखोराने अभिनेत्यावर चाकूने सहा वार केले होते. उपचारानंतर अखेर सैफ अली खान याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. सैफला रुग्णालयातून बाहेर येताना पाहिल्यानंतर चाहत्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. सांगायचं झालं तर, सैफवर हल्ला झाल्यानंतर अभिनेत्याच्या प्रकृतीबाबत चाहत्यांनी चिंता व्यक्त केली होती.
अखेर पाच दिवसांच्या उपचारानंतर सैफ याची प्रकृती उत्तम आहे. रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर सैफ याने पापाराझींना देथील ग्रीट केलं. तेव्हा अभिनेत्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसला. पण प्राणघातक वार झाल्यानंतर अभिनेत्याच्या शरीरावर जखमा अद्यापही आहे. अभिनेत्याला हाताला देखील पट्टी बांधण्यात आली आहे. अशात सैफ स्वतः म्हणाला मी ठिक आहे… सध्या सर्वत्र सैफ अली खान याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सैफ अली खान याच्यावर हल्ला झाल्यानंतर उच्चभ्रू सोसायट्यांमधील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर त्याच्या सोसायटीच्या बाल्कनीत जाळी बसवण्यात आली आहे. हल्ल्यानंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
अभिनेत्यावर झालेल्या हल्ल्यानंतर सोसायटीच्या बाल्कनीत कुणी आत जाऊ नये यासाठी जाळी बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सैफ अली खानच्या सोसायटीचे सुरक्षा रक्षक देखील बदलले जाऊ शकतात, ज्या एजन्सीकडे सुरक्षा रक्षकांचा करार होता तो रद्द करण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे.
पूर्ण बरं होण्यासाठी सैफ किती दिवस लागणार?
सैफ अली खान याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. पण अद्यापही अभिनेत्याला आरामाची गरज आहे. अभिनेता आता चालू आणि बोलू शकतो. पण त्याला पूर्णपणे बरं होण्यासाठी आणखी 1 महिना लागणार आहे. डॉक्टरांनी सैफला पूर्णपणे आराम करण्याचा सल्ला दिला असून जड वस्तू उचलणे, व्यायाम करणे आणि शूटिंग करणे टाळन्याचा सल्ला दिला आहे. तर औषधांचे वेळापत्रक लिलावती हॉस्पिटलमध्ये तयार केले जात आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List