दुबईत साऊथच्या सुपरस्टारचा भयंकर अपघात, कारचे टप हवेत उडाले; व्हिडीओ पाहून हादरले फॅन्स

दुबईत साऊथच्या सुपरस्टारचा भयंकर अपघात, कारचे टप हवेत उडाले; व्हिडीओ पाहून हादरले फॅन्स

Ajith Kumar Accident : साऊथचा सुपरस्टार, अ‍ॅक्शन हिरो अजित कुमार, वय 53 (Ajith Kumar) यांचा भीषण कार अपघात झाला आहे. अजित कुमार हे दुबईत सुरू असलेल्या कार रेसिंगमध्ये भाग घेण्यासाठी आले होते. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी प्रॅक्टिससाठी त्यांनी रेसिंग कार सुरू करताच कारचे टप हवेत उडाले. कार जागीच गोल गोल फिरली आणि भिंतीला जाऊन जोरदार धडकली. या भीषण अपघातातून अजित कुमार हे थोडक्यात बचावले आहेत. हा अपघात अत्यंत भयानक होता. अपघात पाहून उपस्थित हादरूनच गेले. या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अजित कुमार यांचे फॅनच नव्हे तर सर्वसामान्य लोकही हादरून गेले आहेत.

व्हिडीओ पाहून सर्वच हादरले

या भयानक अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अजितक कुमार यांच्या फॅन्सनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अपघात स्पष्टपणे दिसत आहे. अजित कुमार रेस सुरू होण्यापूर्वी प्रॅक्टिस करताना दिसत आहे. ही प्रॅक्टिस करत असतानाच त्यांच्या कारचा खतरनाक अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, अजित कुमार या अपघातातून सुदैवाने बचावले आहेत. त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. त्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं आहे.

 

नशीब बलवत्तर

अजित कुमार यांच्या अपघाताचा व्हिडीओ ज्यांनी पाहिला त्यांच्या काळजात धडधड झाल्याशिवाय राहिली नाही. इतका भयंकर आणि भीषण अपघात होता. या व्हिडीओत कारचे टप हवेत उडालेले स्पष्ट दिसत आहे. कार भिंतीला जाऊन आदळल्याने कारचे तुकडे तुकडे झाल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. अजित कुमार यांचा वाचण्याचीही शक्यता कमी वाटत होती. पण त्यांचं नशीब बलवत्तर म्हणून सुदैवाने ते वाचले.

यापूर्वीही अपघात

दरम्यान, विदामुयार्ची नावाच्या सिनेमाची ते शुटिंग करत होते. यावेळी ते कारचा सीन शूट करत होते. शूटिंग अजर बैजानच्या वाळवंटात होती. त्यावेळी अजित कुमार यांची संपूर्ण कार उलटली होती. त्यावेळीही ते सुदैवाने बचावले होते. त्यानंतर आताही ते अपघातातून बचावले आहेत. अजित कुमार साऊथचे लोकप्रिय अ‍ॅक्शन हिरो आहेत. त्यांनी अनेक सिनेमात काम केलं आहे. कमांडो आणि बिल्ला हे त्यांचे सिनेमे विशेष गाजलेले आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

चित्रपट निर्माते, माजी खासदार प्रितिश नंदी यांचे निधन, वयाच्या ७३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास चित्रपट निर्माते, माजी खासदार प्रितिश नंदी यांचे निधन, वयाच्या ७३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
चित्रपट निर्माते माजी खासदार प्रितीश नंदी यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास घेतला आहे. प्रितीश...
काही भंगार लोक जवळ पाळून उभ्या जातीला डाग लागून घेतला, मनोज जरांगे जोरदार टीका
8 लग्न,13 वर्ष बॉक्स ऑफिसवर राज्य; सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रीचे खासगी आयुष्य फारच चर्चेत
प्रसिद्ध चित्रपट निर्माते, लेखक प्रीतिश नंदी यांचे निधन
अजित पवार गटाबाबत रोहित पावर यांनी केलं सूचक विधान, सुनील तटकरेंचं नाव घेत म्हणाले…
हॉट डॉग खाल्ल्यास देशद्रोही ठरवत श्रमशिबिरात डांबणार; किम जोंग उनचे फर्मान
तोपर्यंत शासकीय मदत घेणार नाही, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांनी 10 लाखांची शासकीय मदत नाकारली