‘लग्न नको, फक्त बेडवर पुरुष हवा..’; हे काय बोलून गेली तब्बू? बातम्या वाचून अभिनेत्री म्हणाली..
तब्बू ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील अत्यंत प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. नव्वदच्या दशकात आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणारी तब्बू आजसुद्धा अनेक दमदार भूमिका साकारताना दिसते. तब्बू तिच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असते. 53 वर्षीय तब्बू आजही अविवाहित आहे. अनेक मुलाखतींमध्ये तिला तिच्या लग्नाविषयी आणि पार्टनरविषयी प्रश्न विचारले जातात. अशाच एका मुलाखतीत तब्बूने या प्रश्नावर दिलेलं उत्तर सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं होतं. “लग्न नको, मला फक्त माझ्या बेडवर एक पुरुष हवा”, असं वक्तव्य तब्बूने केल्याचं त्या मुलाखतीत म्हटलं गेलं. आता याच वृत्तावर तब्बूने तीव्र संताप व्यक्त केला आहे. तब्बूच्या टीमकडून याबद्दल निवेदन जाहीर करण्यात आलं आहे. यामध्ये तिच्या टीमने स्पष्ट केलंय की तब्बूने कधीच अशा पद्धतीचं वक्तव्य केलं नव्हतं. बातम्यांमध्ये छापलेलं तिचं हे वक्तव्य खोटं आहे, असं त्यांनी म्हटलंय.
आपल्या या निवेदनात तब्बूने स्पष्ट केलंय की तिने कधीच मुलाखती किंवा कार्यक्रमांमध्ये अशा पद्धतीचे कमेंट्स केले नव्हते. तब्बूच्या टीमने म्हटलंय, ‘हे छापणं थांबवा. तब्बूच्या नावाने काही अपमानास्पद आणि खोटी वक्तव्ये सांगणाऱ्या अनेक वेबसाइट्स आणि सोशल मीडिया हँडल्स आहेत. आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की तिने कधीही असं वक्तव्य केलं नाही. प्रेक्षकांची दिशाभूल करणं हे नैतिकतेचं गंभीर उल्लंघन आहे. आम्ही मागणी करतो की या वेबसाइट्सने ही खोटी वक्तव्ये त्वरित काढून टाकावीत आणि त्यांच्या कृत्यांसाठी औपचारिक माफी मागावी.’
तब्बूविषयी ज्या बातम्या छापल्या गेल्या आहेत, त्यात तिने असं म्हटल्याचा दावा केलाय की, “मला लग्नात अजिबात रस नाही. मला फक्त माझ्या बेडवर पुरुष हवा.” तब्बूने असं वक्तव्य कधीच कुठे केलं नसल्याचं तिच्या टीमने स्पष्ट केलंय. तब्बूच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास, ती सध्या अक्षय कुमारसोबत ‘भूत बंगला’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यामध्ये अक्षय आणि तब्बूसोबतच परेश रावल यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. प्रियदर्शन या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने अक्षय कुमार आणि तब्बू हे दोघं तब्बल 25 वर्षांनंतर एकत्र काम करत आहेत. याआधी दोघांनी ‘हेरा फेरी’ या चित्रपटात काम केलं होतं.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List