सुष्मिताचा बॉयफ्रेंड होण्याचा रोहमनला पश्चात्ताप? म्हणाला, “माझी ओळख..”

सुष्मिताचा बॉयफ्रेंड होण्याचा रोहमनला पश्चात्ताप? म्हणाला, “माझी ओळख..”

अभिनेत्री सुष्मिता सेन आणि मॉडेल रोहमन यांनी काही वर्षे एकमेकांना डेट केलं. काही वर्षांच्या नात्यानंतर दोघांनी ब्रेकअपचा निर्णय घेतला होता. मात्र ब्रेकअपनंतरही त्यांच्यातील मैत्री अजूनही कायम असल्याचं अनेकदा दिसून येतं. रोहमन अनेकदा सुष्मिता आणि तिच्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवताना दिसतो. इतकंच नव्हे तर विविध कार्यक्रमांमध्येही त्याला सुष्मितासोबत पाहिलं जातं. रोहमनचा स्वभाव पाहता त्याला नेटकऱ्यांनी ‘ग्रीन फ्लॅग’चा (सर्वार्थाने चांगला मुलगा) टॅगसुद्धा दिला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रोहमन सुष्मितासोबतच्या या नात्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाला.

रोहमनने नुकतंच ‘अमरान’ या चित्रपटातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलंय. मात्र त्याला कायम सुष्मिताचा बॉयफ्रेंड किंवा एक्स बॉयफ्रेंड म्हणूनच ओळखलं गेलंय. त्यामुळे स्वत:ची वेगळी ओळख कुठेतरी लपली जाते, असं वाटतं का, असा सवाल त्याला या मुलाखतीत करण्यात आला. त्यावर तो म्हणाला, “या गोष्टींना मी कसा सामोरं जातो? असा प्रश्न असेल तर प्रामाणिकपणे बोलायचं झाल्यास मी त्यांना सामोरं जातच नाही. कारण माझा तो स्वभावच नाही. लोक माझ्याबद्दल काय विचार करतात, याच्याशी मला काहीच घेणंदेणं नाही. यामुळेच मला नात्यात सुरक्षित वाटतं. मला माझं सत्य समजणं महत्त्वाचं आहे.”

याविषयी त्याने पुढे सांगितलं, “जर मी स्वत:शी प्रामाणिक राहिलो, तर लोक काय करतायत या गोष्टींचा मला त्रास होणार नाही. मी आयुष्यात हा एक नियम आवर्जून पाळतो आणि त्यामुळेच मला कोणत्याही नात्यात सुरक्षित वाटतं. एकदा का तुम्ही या इंडस्ट्रीत आलात, की तुम्हाला टीकेची सवय लावून घ्यावी लागते, नाही का? मी हे दररोज करतो. माझ्याबद्दलचा लेख किंवा एखादी बातमी वाचून जरी माझ्या पालकांनी ते विषय काढला, तरी मला त्याने फरक पडत नाही. कारण मी माझं आयुष्य माझ्या अटी-शर्थीवर जगतोय. जर मी काही चुकीचं करत असेन, तर सर्वांत आधी मीच त्यावर प्रश्न उपस्थित करेन. दुसऱ्यांनी मला सांगायची वाट पाहणार नाही. हे तेव्हाच शक्य होतं, जेव्हा तुमचा स्वत:शी जास्त संवाद असतो.”

 

View this post on Instagram

 

A post shared by rohman shawl (@rohmanshawl)

“याआधी मी फारसं काम करत नव्हतो. पण आता माझ्या कामाचीही सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता लोकसुद्धा त्या दृष्टीने विचार करू लागतील. अमरान या चित्रपटानंतर मी माझ्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वत:ची एक रील पोस्ट केली. त्याला 12 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आणि लोक कमेंट्समध्ये फक्त माझ्या कामाबद्दल बोलतायत. त्यामुळे या गोष्टी हळूहळू बदलत आहेत. जेव्हा लोक तुमचं काम बघतील, तेव्हा ते फक्त तुमच्या कामाबद्दल बोलू लागतील. त्यामुळे मी जास्तीत जास्त चांगलं काम करण्यावर भर देतोय”, अशा शब्दांत रोहमन व्यक्त झाला.

रोहमन आणि सुष्मिता यांच्या वयात 15 वर्षांचं अंतर आहे. 2021 मध्ये या दोघांचं ब्रेकअप झालं. मात्र आजही ते एकमेकांसोबत दिसतात. सुष्मितासोबतच्या या नात्याविषयी रोहमन म्हणाला, “रिलेशनशिप होईल. मात्र तुमचं स्वत:सोबत एक नातं असणं खूप महत्त्वाचं आहे. या एकमेव मार्गानेच तुम्ही दुसऱ्यांवर प्रेम करू शकता. यातूनच एकमेकांविषयीचा आदर निर्माण होतो.”

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मोठी बातमी! बाळासाहेबांच्या जयंतीच्या दिवशीच राज्यात मोठा राजकीय भूकंप? मोठी बातमी! बाळासाहेबांच्या जयंतीच्या दिवशीच राज्यात मोठा राजकीय भूकंप?
मोठी बातमी समोर येत आहे, राज्यात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे, शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी मोठा...
शरद पवार यांची उद्धव ठाकरे यांनी घेतली भेट आहे, पडद्यामागे काय होतायत हालचाली
“होय, मीच तो..”; सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीची पोलिसांसमोर कबुली, सांगितलं सर्व सत्य
महिमा चौधरीच्या मुलीच्या सौंदर्यावर चाहते फिदा, 17 व्या वर्षी दिसते आईपेक्षा उंच, तिला पाहून म्हणाल…
प्राजक्ता माळीनंतर तेजश्री प्रधानही थेट आश्रमाच्या वाटेवर; पोस्ट पाहून चाहत्यांना धक्का
‘ब्लॅक’च्या सेटवर लादी पुसली, शिव्याही खाल्ल्या.. आज हाच अभिनेता आहे कोट्यावधींचा मालक
युजवेंद्रकडून धनश्रीने केलीये पोटगीची मागणी? रक्कम ऐकून भुवया उंचावतील