Mumbai News – पवईत तानसा जलवाहिनीला मोठी गळती, दुरुस्तीमुळे अनेक भागातील पाणीपुरवठा तत्काळ बंद
मुंबई महापालिकेच्या तानसा जलवाहिनीला मंगळवारी पहाटे पवई येथील जोगेश्वरी-विक्रोळी जोड रस्त्यावरील पुलाजवळ मोठी गळती लागली. त्यामुळे तानसा जलवाहिनीचा पाणीपुरवठा तत्काळ बंद करण्यात आला आहे. तसेच जलवाहिनी दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे.
दरम्यान, जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी पवई ते धारावी दरम्यानची जलवाहिनी बंद करण्यात आली आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी 24 तासांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे एस विभाग, के पूर्व विभाग, जी उत्तर विभाग आणि एच पूर्व विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे जलवाहिनी दुरूस्ती कालावधीत नागरिकांनी पाणी जपून व काटकसरेने वापरावे, महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे असे प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
तानसा पश्चिम जलवाहिनीला पवई येथील जोगेश्वरी – विक्रोळी जोड रस्त्यावरील पुलाजवळ मोठी गळती लागल्याचे आज पहाटे आढळून आले. त्यामुळे तानसा वाहिनीचा पाणीपुरवठा तत्काळ बंद करण्यात आला.
जलवाहिनी दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. या दुरुस्तीकरीता २४ तासांचा कालावधी… pic.twitter.com/RJBST0xTwE
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) January 21, 2025
कोणत्या भागांचा पाणीपुरवठा राहणार बंद –
एस विभाग- गौतमनगर निम्न पातळी, जयभीम नगर, बेस्ट नगर, फिल्टर पाडा, गावदेवी, पठाणवाडी, महात्मा फुले नगर, मुरारजी नगर, आरे रस्ता, मिलिंद नगर, एल ऍण्ड टी परिसर
के पूर्व विभाग – ओम नगर, साहारगाव, जे. बी. नगर, लेलेवाडी, मरोळ जलवाहिनी, कदमवाडी, शिवाजी नगर, सेव्हन हिल्स रूग्णालय परिसर, चिमटपाडा, टाकपाडा, सागबाग, तरुण भारत, चकाला, कबीर नगर, बामणवाडा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) परिसर
जी उत्तर – धारावी
एच पूर्व – बेहरामपाडा, वांद्रे रेल्वे टर्मिनस
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List