‘प्रसिद्धीसाठी इतक्या खालच्या पातळीला..’; कॅन्सरग्रस्त हिना खानवर अभिनेत्रीची टीका

‘प्रसिद्धीसाठी इतक्या खालच्या पातळीला..’; कॅन्सरग्रस्त हिना खानवर अभिनेत्रीची टीका

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री हिना खान कॅन्सरशी झुंज देत आहे. हिनावर ब्रेस्ट कॅन्सरचे उपचार सुरू आहेत. कॅन्सरवरील उपचार अत्यंत कठीण असून त्यातील किमोथेरेपीदरम्यान सर्व केस गळतात. या परिस्थितीलाही ती धैर्याने सामोरी जातेय. हिना सोशल मीडियाद्वारे सतत तिच्या उपचाराबद्दलची माहिती देत आहे. त्याचसोबत इतर कॅन्सर पीडितांनाही ती प्रेरणा देतेय. अनेकजण तिच्या धैर्याचं कौतुक करत आहेत. मात्र एका अभिनेत्रीने हिनावर याच कारणासाठी टीका केली आहे. हा सगळा पीआर स्टंट असून प्रसिद्धीसाठी ती सर्वकाही वाढवून-चढवून सांगत असल्याची टीका रोजलीन खानने केली.

रोजलीन खानची पोस्ट-

रोजलीनने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये लिहिलंय, ‘एका महिलेसाठी सर्वांत मोठं दु:ख म्हणजे किमोथेरपीमुळे केस गमावणं. ही गोष्ट तुम्ही नॉर्मल करू शकता का? प्राणी संग्रहालयातील सिंहीण हिंमत दाखवू शकते का? ती तिसऱ्या स्टेजच्या उपचाराविषयी दोन ओळी तरी सांगू शकते का? की तिने फक्त प्रकाशझोतात राहण्यासाठी कॅन्सरचा उपयोग केलाय? गैरसमज पसरवण्यासाठी केलेली ही अत्यंत दयनीय आणि लज्जास्पद कृती आहे. कारण हेडलाइन्समध्ये राहण्यासाठी कॅन्सरचा वापर करणाऱ्या काही जणांना आणि तुला ही गोष्ट माहीत आहे की मेडिकल गैरसमज पसरवण्यासाठी भारतात काही शिक्षा नाही. सोनाली बेंद्रे, लिसा, मनिषा कोईराला यांसारख्या काही सजग अभिनेत्रींनी कधीच इतकी खालची पातळी गाठून लोकांची दिशाभूल केली नव्हती.’

इतक्यावरच न थांबता रोजलीनने आणखी पोस्ट लिहिली आहे. त्यात तिने म्हटलंय, ‘अशा जीवघेण्या आव्हानांना तोंड देणाऱ्या लोकांप्रती तुमची काही सामाजिक जबाबदारी आहे का की तुम्हाला फक्त तुमच्या व्यावसायिक उद्दिष्टांसाठी कॅन्सरचा वापर करायचा आहे? ती तिच्या कॅन्सरच्या टप्प्याबद्दल योग्य माहिती देत आहे का, याबद्दलची मला खात्री नाही. ती कधी एमआरएम आणि रेडिएशनच्या तिसऱ्या टप्प्यातील रुग्ण असल्याबद्दल बोलली आहे का? मी अशा मानसिक आजारी लोकांसाठी फक्त प्रार्थना करू शकते, जे कॅन्सरने ग्रस्त आहेत आणि त्याचा वापर पब्लिसिटी स्टंट म्हणून करत आहेत. चला, कॅन्सर झालंय, न्यूज आहे, चला ती बातमी बनवूया.’ रोजलीनच्या या पोस्टवर अद्याप हिनाकडून कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नाही.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Crop Insurance : बोगस पीक विम्याचा ‘आका’ कोण? कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा गौप्यस्फोट, राज्यात इतके लाख अर्ज बाद, सीएसएस सेंटर रडारवर Crop Insurance : बोगस पीक विम्याचा ‘आका’ कोण? कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा गौप्यस्फोट, राज्यात इतके लाख अर्ज बाद, सीएसएस सेंटर रडारवर
राज्याचं नाही तर बीड हे देशाच्या केंद्रस्थानी आले. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्याच नाही, तर अनेक घोटाळ्याच्या अग्रस्थानी बीड...
‘…अशी वेळ कुठल्याच सरकारवर आली नाही’, एकनाथ शिंदेंच्या नाराजीची चर्चा; ठाकरे गटाचा नेता थेट बोलला
Crop Insurnace : धाराशिवच्या 565 शेतकर्‍यांनी शासनालाच लावला चुना; 1 रुपयात पीक विमा प्रकरणात कारवाई होणार, या जिल्ह्यातील शेतकरी रडारवर
रेणुका शहाणेंची मुले फारच संस्कारी; आईच्या आदेशाचं पालन; मुलांचा साधेपणा नेटकऱ्यांना भावला
‘त्यांच्यावर वार झालेत आणि तू…’, सैफवर हल्ला, पण ट्रोल होतेय पलक तिवारी
सलमानप्रमाणेच सैफ अली खानच्या घरासाठी नवी सुरक्षा योजना;घरातही केले मोठे बदल; नवीन घराचा व्हिडीओ व्हायरल
सैफ अली खानला मिळाला 35 लाख रुपयांचा मेडिक्लेम; डॉक्टरकडून प्रश्न उपस्थित