थिएटरमध्ये बकरा कापणे चाहत्यांना भोवले पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
दाक्षिणात्य सुपरस्टार नंदमुरी बालकृष्ण यांचा ‘डाकू महाराज’ सिनेमा पाहायला आलेल्या चाहत्यांनी थिएटरमध्ये बकरा कापल्याने संतापाची लाट उसळली. या विकृत चाहत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
तिरुपती येथील प्रताप थिएटरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. नंदमुरी बालकृष्ण यांच्या चाहत्यांनी ‘डाकू महाराज’ सिनेमा पाहताना एका बकऱ्याच्या मानेवर चाकू ठेवून थिएटरमध्ये त्याचा बळी दिला. याशिवाय या चाहत्यांनी उत्साहात सिनेमाच्या पोस्टरवरही बकऱ्याचं रक्त शिंपडलं. पेटा इंडियाने याची दखल घेतली असून या पाच माथेफिरू चाहत्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय. याआधीही ज्यु. एनटीआर आणि सैफ अली खान यांच्या ‘देवरा पार्ट 1’ सिनेमाच्या स्क्रीनिंगच्या वेळेस अशी विचित्र घटना घडली होती. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List