आता फेक कॉल येणार नाहीत…
सध्या टेलिमार्पेटिंग, स्कॅम कॉल्समुळे लोक त्रस्त आहेत. त्यामुळे बऱ्याचदा आर्थिक नुकसान सोसावे लागते. त्यातच अनेकदा अनोळखी नंबरवरून कॉल येतात. कॉलरचे नाव भलतेच असते आणि प्रत्यक्षात कॉल दुसऱयाचाच असतो. यावर उपाय म्हणून दूरसंचार विभागाने ‘कॉलरचे खरे नाव दाखवा’ असे सक्त आदेश टेलिकॉम कंपन्यांना दिले आहेत. कॉलिंग नेम प्रेझेंटेशन (सीएनएपी) ही सेवा तत्काळ सुरू करण्यास सांगितली आहे. त्यामुळे इनकमिंग कॉलच्या वेळी सिमकार्ड ज्याच्या नावावर आहे त्याचे खरे नाव दिसणार आहे.
कॉलिंग नेम प्रेझेंटेशन सुविधेसोबत पंतप्रधान कार्यालयाने दूरसंचार विभागाला सिमकार्ड नोंदणी प्रक्रियेवर अधिक कठोर नियम लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. बायोमेट्रिक व्हेरिफिकेशनशिवाय नवीन सिमकार्ड विक्री करण्यास टेलिकॉम पंपन्यांना मज्जाव करण्यात आलाय. स्मार्टपह्न युजर्सचा संवाद अधिक प्रभावी आणि सुरक्षित बनेल.
केवायसीवर आधारित सुविधा
कॉलिंग नेम प्रेझेंटेशन ही सुविधा कॉल करणाऱया व्यक्तीच्या केवायसीवर आधारित असेल. सिमकार्ड खरेदी करताना जी कागदपत्रे दिली असतील, त्यावर ही सुविधा असेल. ट कॉलरसारखी ही सेवा नसेल. अधिकृत नोंदणीकृत माहितीवर ही सुविधा काम करेल. त्यामुळे फेक कॉल्स आणि फसवणुकीला आळा बसेल.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List