हिंदुस्थानातील टवटवीत भाज्या, फळे जगभरात पोहोचणार, जेएनपीए उभारणार 284 कोटींचा प्रक्रिया, पॅकिंग, शीतगृह प्रकल्प

हिंदुस्थानातील टवटवीत भाज्या, फळे जगभरात पोहोचणार, जेएनपीए उभारणार 284 कोटींचा प्रक्रिया, पॅकिंग, शीतगृह प्रकल्प

हिंदुस्थानातील फळे तसेच भाज्यांना जगभरातून मोठी मागणी असून वर्षाला जवळपास 665 मिलियन टन मालाची निर्यात होते. आता ही फळफळावल आणि विविध भाज्या जगभरात ताज्या, टवटवीत पोहोचवता येणार आहेत. यासाठी जेएनपीए 284 कोटींचा प्रकल्प उभारणार असून दोन कंपन्यांबरोबर करार केला आहे. या प्रकल्पात प्रथम सर्व प्रकारच्या मालावर प्रक्रिया तसेच पॅकिंग करून विक्रीसाठी पाठवले जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळणार आहे.

27 एकर भूखंडावर उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पात जवळपास 1.2 दशलक्ष टन क्षमतेच्या कृषिमालावर प्रक्रिया, त्याचा साठा व प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार आहे. जेएनपीएतील फुंडे गावाजवळ हा महत्त्वाचा प्रकल्प उभारण्यात येणार असून हा देशातील पहिलाच मोठा प्रकल्प असणार आहे.

कृषिमाल निर्यात योग्य तयार करण्यासाठी मेसर्स ट्रायडेंट अॅग्रोकॉम एक्सपोर्ट्स प्रा. लि. आणि मेसर्स मॅन इन्फ्राकन्स्ट्रक्शन लि. (कन्सोर्टियम) या दोन कंपन्यांसोबत केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी करार केला आहे. या कंपन्यांच्या मदतीने शेतमालाचे प्रयोगशाळेमार्फत वर्गीकरण करण्यात येणार आहे. तसेच हा माल ताजा आणि टवटवीत राहावा यासाठी भाज्या आणि फळांवर प्रक्रिया करून त्या सुकवणे, त्याला वॅक्सिंग करणे आणि पॅकिंग करून निर्यातीसाठी तयार करण्याची जबाबदारी करार केलेल्या कंपन्यांकडे देण्यात आली आहे.

प्रकल्पाच्या निर्मितीनंतर देशातील कृषिमालाची निर्यात क्षमता वाढणार आहे. या प्रकल्पामुळे देश व आंतरराष्ट्रीय कृषी व्यापाराला चालना मिळेल. हा एक महत्त्वपूर्ण प्रकल्प असल्यामुळे तो वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे, असे जेएनपीएचे अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

फडणवीसांसोबत नेमकी काय चर्चा झाली? मस्साजोगहून मुंबईत आलेल्या देशमुख कुटुंबियांचा खुलासा फडणवीसांसोबत नेमकी काय चर्चा झाली? मस्साजोगहून मुंबईत आलेल्या देशमुख कुटुंबियांचा खुलासा
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे महाराष्ट्राचे राजकारण तापलं आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी...
गौरीची ‘ती’ अवस्था पाहून लग्नाच्या पहिल्याच रात्री शाहरूख खान ढसा ढसा रडला होता; असं काय घडलं होतं?
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी यशस्वी जैस्वालला मिळणार संधी? शमी-हार्दिकच्या पुनरागमनाचीही शक्यता
HMPV व्हायरसचे चीनमध्ये थैमान, वुहानमध्ये शाळा बंद; WHO ने अहवाल मागवला
राजीनाम्याच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया, म्हणाले मी…
परिवर्तनासाठी आतापासून संघर्ष केला पाहिजे; वैभव नाईक यांचे शिवसैनिकांना आवाहन
मला पुन्हा मुख्यमंत्री निवासातून बाहेर काढलं, CM अतिशी यांचा केंद्रावर निशाणा