वॉचमनच्या नोकरीसाठी गेलेल्या उत्तर प्रदेशच्या तरुणांना रशिया युक्रेन युद्धावर पाठवलं, दोघांचा मृत्यू; अनेकजण बेपत्ता
गेल्या तीन वर्षांपासून रशिया युक्रेन युद्ध सुरू आहे. दूर रशियामध्ये हे युद्ध सुरू असताना त्याचा संबंध भारतातल्या उत्तर प्रदेशशीही जोडला गेला आहे. गेल्या वर्षी उत्तर प्रदेशच्या आझमगड आणि मऊ जिल्ह्यातून 13 तरुण नोकरीसाठी रशियात गेले होते. पण वॉचमनचं काम सांगून या तरुणांना युक्रेनविरोधात वापरलं गेलं. यात दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. दोन जखमी झाल्याने परत आले आहेत. तर उर्वरित ८ तरुण कुठे आहेत याबाबत काहीच माहिती नाही.
या 13 तरुणांना रशियामध्ये वॉचमन, कूक आणि मदतनीस म्हणून नेले होते. तसेच प्रत्येकाला दोन लाख रुपये मिळतील असेही सांगितले होते. पण वॉचमनचं काम सांगून या तरुणांना युद्धभूमीवर पाठवलं.
आझमगडचा कन्हैया यादव आणि मऊ जिल्ह्याचा श्यामसुंदर, सुनील यादव हे युद्धात कामी आले आहेत. दुसरीकडे राकेश यादव आणि ब्रिजेश यादव हे जखमी झाल्याने मायदेशी परतले आहेत. विनोद यादव, योगेंद्र यादव, अरविंद यादव, रामचंद्र, अझरुद्दीन यादव, हुमेश्वर प्रसाद, दीपक आणि धीरेंद्र कुमार हे तरुण कुठे आहेत याची काहीच माहिती नाही.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List