आयटी कंपनीची मालकीण कर्मचाऱ्याच्या प्रेमात, 5 कोटी घेऊन ‘तो’ फरार
आयटी कंपनीची मालकीण एका कर्मचाऱ्याच्या प्रेमात पडली. त्याच्यासोबत लग्नही केले, मात्र काही काळातच तिचा पती तिला 5 कोटी रुपयांना गंडा घालून फरार झाला. महिलेला आणि तिच्या मुलाला सोडून निघून गेला. गुजरातच्या या महिलेने ओडिशातील भद्रक जिह्यातील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती, मात्र पोलिसांनी काहीच कारवाई न केल्याने त्रस्त महिलेने पोलीस ठाण्यात जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. पीडित महिला अहमदाबाद येथील आयटी कंपनीची मालकीण आहे. कंपनीत काम करणाऱ्या मनोज नायक नावाच्या कर्मचाऱ्याच्या प्रेमात पडून तिने त्याच्याशी लग्न केले. त्यांना दोन वर्षांचा मुलगा आहे. मनोजने लग्नानंतर त्याच्या गावी नरसिंहपूर येथे व्यवसाय करण्यासाठी महिलेला तयार केले. त्यामुळे महिलेने तिची मालमत्ता, कंपनी गहाण ठेवून मनोजला 5 कोटींचे कर्ज घेऊन दिले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List