आता पीएफ खाते ट्रान्सफर करणे सोपे
खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याने नोकरी बदलली, तर त्याला आता जुने पीएफ खाते ट्रान्सफर करणे एकदम सोपे होईल. ईपीएफओने जारी केलेल्या परिपत्रकानुसार आता पीएफ अकाऊंट ट्रान्सफर करण्यासाठी जुन्या किंवा नव्या कंपनीकडून ऑनलाईन अर्ज पाठवण्याची गरज नाही. खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदारांच्या बेसिक सॅलरीच्या 12 टक्के रक्कम ईपीएफओ खात्यात जाते. तेवढीच रक्कम कंपनीकडून पीएफ खात्यात जमा केली जाते. कंपनीकडून जमा केल्या जाणाऱ्या रकमेपैकी 8.33 टक्के भाग ईपीएस (कर्मचारी पेंशन योजना) मध्ये जातो, तर उर्वरित 3.67 टक्के रक्कम ईपीएफमध्ये जाते. ईपीएफओचे करोडो सबक्रायबर्स आहेत. 15 जानेवारी 2025 रोजी ईपीएफओच्या सर्क्युलर अनुसार पीएफ खाते ट्रान्सफर करण्यासाठी जुन्या किंवा नव्या कंपनीकडून ऑनलाईन अर्ज करण्याची गरज भासणार नाही. खातेधारक स्वतःच अकाऊंट ट्रान्सफरसाठी क्लेम करू शकेल.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List