Mahakumbh Mela – आयआयटीयन बाबा पुन्हा चर्चेत

Mahakumbh Mela – आयआयटीयन बाबा पुन्हा चर्चेत

महाकुंभमध्ये आयआयटीयन बाबा अशी ओळख असलेल्या अभय सिंह यांची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. अभय सिंह हे आई-वडील येण्याआधीच महाकुंभ सोडून गेल्याची चर्चा पसरली होती. परंतु, ही केवळ अफवा आहे. ही अफवा आश्रमातील साधूंनी पसरवली होती, असा आरोप अभय सिंह यांनी केला आहे. महाकुंभमधील जुना आखाडय़ाच्या 16 मडी आश्रममधून ते अचानक एका अज्ञात स्थळी निघून गेले होते. परंतु, या सर्व गोष्टींवर अभय सिंह यांनी पुढे येत पडदा टाकला आहे. अभय सिंह यांचा जुना आखाडय़ात प्रवेश कसा झाला? याबाबत माहिती देताना आखाडय़ाचे संत सोमेश्वर पुरी यांनी सांगितले की, अभय सिंह त्यांना वाराणसीमध्ये भटकत असताना सापडले होते. त्यांनीच त्यांना आश्रमात आणले. आता मी प्रसिद्ध झालो तर त्यांनी स्वतःला माझे गुरू बनवून टाकले. परंतु आमच्यात गुरू-शिष्याचे नाते नाही, असे अभय सिंह म्हणाले.

साधूंचा आक्षेप

अभय सिंह प्रसारमाध्यमांना मुलाखती देत सुटले होते. यावेळी त्यांनी नको त्या विषयावरही भाष्य केले, जे त्यांनी करायला नको होते. त्यांना जुना आखाडयाचे आचार्य महामंडलेश्वर अवधेशानंद गिरी यांच्याकडेही घेऊन जाण्यात आले होते. अभय सिंह यांची मानसिक स्थिती पाहता जुना आखाडय़ाने त्यांना आश्रम सोडण्याचे निर्देश दिले. त्यामुळे ते आश्रम सोडून निघून गेले होते.

महाकुंभ सोडून गेल्याची अफवा, अभय सिंह यांचा आरोप

आयआयटीयन बाबाने आज पुन्हा एकदा प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आश्रमातील काही साधूंनी माझ्याबद्दल चुकीची बातमी पसरवली आहे. त्यांनी मला रात्रीच तिथून निघून जाण्यास सांगितले. त्यांना वाटते की, मी देशभर प्रसिद्ध झालो आहे. त्यामुळे जर त्यांच्यातल्या काही गोष्टी माहीत झाल्या तर मी त्यांच्या विरोधात जाईल. त्यामुळे त्यांनी मी गुप्त साधनेसाठी महाकुंभातून गेलो असल्याचे परस्पर सांगून टाकले. ते लोक काहीही बरळत सुटले आहेत,  त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, असे अभय सिंह म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ज्यांना आरक्षण घ्यायचंय ते घेतील, ज्यांना नको ते नाही घेणार, जरांगे यांनी राणेंना स्पष्ट सुनावणे ज्यांना आरक्षण घ्यायचंय ते घेतील, ज्यांना नको ते नाही घेणार, जरांगे यांनी राणेंना स्पष्ट सुनावणे
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी आरक्षणांवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना स्पष्टच सुनावणे आहे. कुणबी आणि क्षत्रिय देखील आम्हीच...
‘…तर त्याचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही,’पालकमंत्री पद न मिळाल्याने गोगावले संतापले
एक फोन कॉल आणि मोहम्मद शेहजादचा खेळ खल्लास, सैफ अली खानवरील हल्लोखोरांपर्यंत पोलीस पोहचले कसे? ही Inside Story वाचली का?
Bigg Boss 18 फिनालेमध्ये पोहोचण्यासाठी ‘या’ स्पर्धकाने निर्मात्याला दिली मोठी रक्कम? नक्की काय आहे सत्य
‘माय नेम इज जान’चा दिल्लीत सोलो म्यूजिकल प्ले; केंद्रीय मंत्री शेखावत म्हणाले, या नाटकाचे अनेक शो व्हायला हवे
अटक होण्याच्या भीतीने आरोपी करत होता असं काम, तपासात धक्कादायक माहिती समोर
सोने चांदी नाही तर केसांवर जडला चोरांचा जीव, व्यापाऱ्याच्या घरात 150 किलो वजनाच्या केसांवर डल्ला