अपुऱ्या सुविधांमुळेच मुलींची शाळेला दांडी, सुलभ स्वच्छता मिशन फाऊंडेशनचा चिंताजनक अहवाल
मासिक पाळीदरम्यान शाळांतील शौचालयांच्या निकृष्ट सुविधांमुळे मुलींना त्याचा वापर करण्याची भीती वाटते. त्यामुळे मासिक पाळीदरम्यान शाळेत मुलींची गैरहजेरी वाढते. तसेच गावोगावी महिला डॉक्टरांचा अभाव असल्यामुळे मासिक पाळीशी संबंधित आरोग्य समस्यांसाठी महिला वैद्यकीय सल्ला घेऊ शकत नाहीत. मासिक पाळीबद्दल समाजात आजही शांतता दिसून येत असल्याचे चिंताजनक वास्तव सुलभ स्वच्छता मिशन फाऊंडेशनच्या संशोधन अभ्यासातून समोर आलंय.
सुलभ स्वच्छता मिशन फाऊंडेशनने देशातील मासिक पाळीच्या स्वच्छता व्यवस्थापनावर आधारित एक व्यापक संशोधन अहवाल शुक्रवारी प्रकाशित केला. याअंतर्गत महाराष्ट्र, हरयाणा, बिहार, छत्तीसगड, आसाम, ओडिशा, तामीळनाडू या सात राज्यांतील 14 जिह्यांतील महिला सहभागी झाल्या. 20 ते 49 वयोगटातील महिलांनी दिलेल्या माहितीवर संशोधन करण्यात आले.
असा आहे अहवाल
- सहभागी 30 टक्के महिलांनी मासिक पाळीत कापडाचा वापर करत असल्याचे सांगितले. सॅनिटरी पॅड आर्थिकष्टय़ा परवडत नसल्याने महिलांनी सांगितले.
- 91.7 टक्के मध्यमवयीन महिलांनी सांगितले की, महिला डॉक्टरांच्या अभावामुळे त्यांनी मासिक पाळीशी संबंधित आरोग्य समस्यांसाठी वैद्यकीय सल्ला घेणे टाळले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List