दहावी-बारावीच्या हॉल तिकिटावर जातीचा उल्लेख केल्याप्रकरणी शिक्षण विभागाची माफी, निर्णय मागे घेणार
दहावी बारावीच्या परीक्षेसाठी जारी करण्यात आलेल्या हॉल तिकीटावर चक्क जातीचा उल्लेख करण्यात आला होता. या निर्णयावर चौफेर टीका झाल्यानंतर शिक्षण विभागाने माफी मागितली आहे. तसेच नवीन हॉल तिकीट देण्याचा निर्णयही शिक्षण विभागाने घेतला आहे.
काही दिवसांत दहावी बारावीची परीक्षा होऊ घातली आहे. या परीक्षेसाठी शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट जारी केले. पण या हॉल तिकिटावर जातीचा उल्लेख करण्यात आला होता. त्यानंतर शिक्षण विभागावर चौफेर टीका झाली. दहावी बारावी झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ट्रान्सफर सर्टिफिकेट आणि लिविंग सर्टिफिकेट देताना अडचण होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्टीकरण शिक्षण विभागाने सांगितले. पण आता शिक्षण विभागाने हा निर्णय मागे घेतला आहे. तसेच नवीन हॉल तिकीटही जारी करण्याचे आदेश दिले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List