कबुतर दाखवतो सांगून लैंगिक अत्याचार, आरोपीला 10 वर्षे कारावासाची शिक्षा
कबुतर दाखवतो असे सांगून घराच्या छतावर 7 वर्षांच्या मुलाला घेऊन जात त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी अटक केलेल्या आरोपीला मुंबई सत्र न्यायालयाने दणका दिला आहे. पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या आरोपीला न्यायालयाने 10 वर्षांचा कारावास व 20 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
धारावी येथे दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला त्याच परिसरात राहणाऱ्या आरोपीने कबुतराचे आमिष दाखवले व घराच्या छतावर घेऊन जात त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी पोलिसांनी पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला व अटक केली. आरोपीला सत्र न्यायालयात सादर करण्यात आले. त्या वेळी सरकारी वकील वीणा शेलार यांनी आरोपीची सुटका करू नये, त्याला जास्तीत जास्त शिक्षा ठोठवावी, अशी मागणी केली. विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश प्रिया बनकर यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली तेव्हा न्यायालयाने आरोपीला 10 वर्षं कारावास व 20 हजार दंडाची शिक्षा ठोठावली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List