साय-फाय – निसर्गाचा इशारा

साय-फाय – निसर्गाचा इशारा

>> प्रसाद ताम्हनकर

अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमध्ये लागलेल्या आगीची दाहकता कमी होत नसताना आता कश्मीरमध्येदेखील भयंकर अग्नीतांडव घडल्याच्या बातम्या येत आहेत. किश्तवाड जिह्यातील दुर्गम अशा बावडनमध्ये मार्गी आणि मालवन अशी दोन गावे आगीत भस्मसात झाल्याची बातमी आहे. उणे 10 डिग्री इतके थंड वातावरण आणि पडत असलेला बर्फ यांनादेखील ही आग जुमानत नसल्याचे चित्र आहे. मालवन गावात या पूर्वी ऑक्टोबरमध्येही आग लागली होती आणि त्यात 70 पेक्षा जास्त घरे भस्मसात झाली होती. तुम्ही तंत्रज्ञानात कितीही पुढारलेले असलात आणि तुमच्याकडे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अत्याधुनिक साधनांची फौज जरी असली, तरी निसर्गाच्या फटक्यासमोर तुम्ही कसे दुर्बल बनून जाता याचे एक उदाहरण म्हणजे या आगीच्या घटना आहेत. सतत पसरत असलेले हे वणवे म्हणजे निसर्गाने दिलेला एक कठोर इशारा आहे असे म्हणायला हरकत नाही.

कश्मीरच्या आगीने झालेल्या नुकसानाबद्दल हा लेख लिहीत असेपर्यंत काही माहिती उपलब्ध झालेली नाही. मात्र लॉस एंजेलिसमध्ये लागलेल्या आगीने आतापर्यंत 250 अब्ज अमेरिकन डॉलर्सचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या आगीने आता मोठय़ा प्रमाणावर निवासी भागाचा ताबा घेतला असून 24 लोकांचा यात बळी गेला आहे. निसर्गाचे हे रौद्र रूप अवाक् करणारे आहे. विविध वाहिन्यांवर दाखवले जात असलेले या आगीचे व्हिडीओ मनाचा थरकाप उडवणारे आहेत. हवामान आणि वातावरणात सतत होत असलेल्या बदलामुळे ही आग आणखी दूरवर पसरली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सतत वाहत असलेल्या जोरदार वाऱयांनी ही आग पसरवायला आणखी मदत मिळत आहे आणि त्यामुळे अमेरिकेची चिंता वाढायला लागली आहे.

या भीषण आगीमुळे सामान्य माणसापासून ते अनेक सेलिब्रिटीपर्यंत सगळ्यांना दणका बसलेला आहे. हजारो एकरांत पसरलेल्या या आगीने लाखो लोकांना राहते घर सोडून पळ काढण्यास भाग पाडले आहे. आतापर्यंत हजारो घरे आणि लाखो गाडय़ा या आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या आहेत. बऱयाच प्रसिद्ध कलाकारांची घरे पूर्णत बेचिराख झाली आहेत. आयुष्याची सुख-दुःख जिथे अनुभवली, यशाच्या मैफली सजवल्या, मित्रांच्या जोडीने रात्री जागवल्या ते घर जळताना बघून अनेकांना आपले दुःख आवरता आले नाही. घराच्या आठवणी, होत असलेले दुःख अनेकांनी सोशल मीडियावर शब्दबद्ध केले आहे.

या भयानक वणव्यामागचे कारण शोधले जात आहे. सदोष वायरींमुळे ही आग पसरल्याचे सध्या बोलले जात आहे. मात्र काही काळापूर्वी पसरलेला दुष्काळ आणि त्यामुळे वाळून गेलेली झाडे, गवत आणि इतर वनस्पती यांच्यामुळे ही आग अधिक वेगाने पसरली आहे याकडे अनेक हवामान तज्ञ लक्ष वेधत आहेत.

मानवाने निसर्गावर कुरघोडी करण्याचे प्रयत्न आता तरी थांबवावेत हेच या घटनेने दाखवून दिले आहे. या वणव्यापासून काही मैलावर समुद्र आहे, पण त्याचे खारट पाणी आग विझवण्यासाठी वापरता येत नाही अशी अडचण आहे. समुद्राचे खारे पाणी आग विझवणाऱया यंत्रांसाठी तर धोकादायक आहेच, पण या पाण्यातील मिठामुळे इथली जमीन नापीक होण्याचादेखील धोका आहे.

हवामान तज्ञांच्या अनुमानानुसार पुढील काही दिवसांत इथे पाऊस पडण्याचीदेखील शक्यता नाही. त्यामुळे त्या पाण्याची मदत मिळणेदेखील अवघड आहे. या आगीने लॉस एंजेलिसच्या अनेक भागांत वीजपुरवठा खंडित झाला आहे. ठिकठिकाणी रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी होत आहे. ही सगळी परिस्थिती बघता कॅलिफोर्निया विश्वविद्यालय आणि काही शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. सनसेट, हर्स्ट, लिडिया, इटन, पॅलिसेट्स, केनेथ अशा सर्व भागांत ही आग पसरलेली आहे. मानवी हस्तक्षेपामुळे हवामानात सतत होत असलेले बदल, उष्ण वारे आणि दुष्काळ ही या आगीमागची प्रमुख कारणे असल्याचे तज्ञ सांगतात. हे वणवे आता वर्षभराची समस्या बनलेली असल्याचा खेददेखील ते व्यक्त करतात. हा भयानक वणवा जगाचे डोळे उघडेल का, हे आता येणारा काळच सांगेल.

z [email protected]

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Saif Ali Khan : हल्ला केल्यानंतर आरोपी BJ कुठे दडून बसला? पोलिसांनीच केला खुलासा, असा पकडल्या गेला Saif Ali Khan : हल्ला केल्यानंतर आरोपी BJ कुठे दडून बसला? पोलिसांनीच केला खुलासा, असा पकडल्या गेला
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्लाप्रकरणात चार दिवसानंतर 200 पोलिसांच्या टीमला मोठे यश आले. गेल्या चार दिवसांपासून पोलिसांना चकमा देणार्‍या...
पाच महिन्यापूर्वी सैफच्या हल्लेखोराची मुंबईत एन्ट्री, त्यानंतर…; पोलिसांकडून मोठी माहिती समोर
आरोपी सैफच्या घरात का गेला? त्याला कोणी मदत केली का? पोलिसांकडून घटनेचा उलगडा
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर बांगलादेशी असल्याची शक्यता? मोठी माहिती समोर
Saif Ali Khan Attack : अंगावर झाडाची पानं, पांघरलेलं गवत अन्… ठाण्यातील ‘या’ परिसरात लपलेला आरोपी, कशी केली अटक? पाहा A टू Z अपडेट
सैफच्या घरातून पोलिसांना आढळली धक्कादायक गोष्ट, हल्ल्यानंतर कसून चौकशी सुरु
सावकारी जाचामुळे सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न, मुलाचा खून करून पती-पत्नीने घेतला गळफास, पत्नीचा मृत्यू; तिघे गजाआड