सरकारी नोकरी लागताच पत्नीने नवऱ्याला सोडले
सरकारी नोकरी लागल्यानंतर पत्नीने नवऱ्याला सोडल्याची घटना उत्तर प्रदेशात उघडकीस आली आहे. दिल्लीच्या सरकारी शाळेत पत्नीला नोकरी मिळाल्यानंतर तिचे हावभाव बदलले असून ती आता आपल्यासोबत राहणे पसंत करत नाही, असा गंभीर आरोप पतीने केला. पत्नीच्या विरोधात नवऱ्याने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली असून न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. कानपूर येथील बजरंग भदौरिया यांचा विवाह 2023 मध्ये साहिबाबाद येथील राहणाऱ्या लक्षिता हिच्यासोबत झाला होता. विवाह झाला त्या वेळी मुलगी शिक्षक होण्यासाठी परीक्षा देत होती, परंतु लग्नानंतर ती या परीक्षेत उत्तीर्ण झाली. त्यानंतर तिच्या वागण्यात आणि बोलण्यात मोठा बदल झाला. काही महिन्यांनंतर दिल्लीत सरकारी शाळेत शिक्षक म्हणून तिची नियुक्ती झाली. यानंतर सासरच्या लोकांनी तिला माहेरी घेऊन गेले. आता ते तिला पतीसोबत राहू देत नाही. महिलेला सोबत नेल्यास जिवे मारण्याची धमकी देत आहेत, असे म्हटले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List